जामखेड नगरपरिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के निधी वाटप ; प्रहारच्या प्रयत्नांना यश

जामखेड प्रतिनिधी
दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत समाजात त्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे त्यांना शासनाच्या योजनांचा योग्य प्रकारे लाभ मिळाला पाहिजे या हेतूने प्रहार जनशक्ती पक्ष काम करत आहे जामखेड तालुक्यातील विविध प्रश्नांवर प्रहारच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करण्यात आली असून त्याला आनेक वेळ यश देखील मिळाले तसेच नगर परिषद हद्दीतील दिव्यांग बांधवांसाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी नुकतेच पाच टक्के निधीचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नईम भाई सुभेदार यांनी वारंवार नगरपरिषदकडे पाठपुरावा केला तसेच सर्व लाभार्थी यांचे कागदपत्रे जमवून त्यातील त्रुटी दूर करून प्रस्ताव नगर परिषदेला देण्यात आले व सुमारे दोनशे च्या पुढे लाभार्थींना निधी मंजूर करून वाटप करण्यासाठी प्रयत्न केले

यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे जामखेड तालुका अध्यक्ष नय्युमभाई सुभेदार यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अजय साळवे यांचे मन:पूर्वक आभार मानले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले, जवळा जिल्हा परिषद गटाध्यक्ष राहुल भालेराव, प्रमोद खोटे (युवक तालुकाध्यक्ष), सचिन उगले (दिव्यांग तालुकाध्यक्ष), संजय मोरे (मूकबधिर संघटक), भोसले सर, दिनेश उगले, बलभीम पाटील, ईश्वर ससाणे, ढोले ताई, राजेश भोगील,डॉ. एहसान शेख, दिव्यांग सेल तालुकाउपाध्यक्ष संजय मोरे, शहराध्यक्ष दिनेश राळेभात, शहराध्यक्ष सोहेल तांबोळी, युवती अध्यक्षा स्नेहा शिंदे, चित्रा शिंदे आदी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


