उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहराचा विकास हाच ध्यास:महेश निमोणकर

- Advertisement -spot_img

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा महेश निमोणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ नगरसेवक निवडून द्या:संध्या सोनवणे

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहराची अवस्था अत्यंत बिकट दोन आमदारांमुळेच आहे. शहरात विकास नाही,फक्त एकमेकांचे उणेदूणे काढण्यात वेळ घालवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहराचा विकास हाच ध्यास घेऊन जामखेड नगरपरिषद निवडणुकीत आम्ही उतरलो आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ.सुवर्णा महेश निमोणकर व नगरसेवक पदाचे  ११ उमेदवारांचे चिन्ह घड्याळ असून त्यांना मतदान करून विजयी करा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जामखेडचा विकास करूनच दाखवू.असे माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आज दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात होती.यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना निमोणकर म्हणाले की, राजकारण,समाजकारण करताना कसलाही डाग लागू दिला नाही.समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना संकटकाळी व अडीअडचणीत अहोरात्र मदतीसाठी उपलब्ध राहिलो आहे.आमच्या समोर धनदांडगे मोठ- मोठे लोक उभे आहेत ,मात्र लोक आमच्या बरोबर आहेत. आम्ही तळमळीने काम करत आलो आहोत हे सुज्ञ मतदार जानत आहेत.आमचा जनतेवर विश्वास आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जामखेडचा विकास करून,जनतेला मुलभूत सुविधा देण्यासाठी व जामखेड स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी तसेच जनतेच्या आरोग्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वतंत्र दवाखाना करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. जातीपातीचे राजकारण न करता आपल्या कामाचा माणूस म्हणुन आमच्या कडे पहा असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लाडक्या बहिणीं म्हणजे महिला भगिनींचा आमला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महेश निमोणकर हे सामान्य कुटुंबातील असून तळमळीने काम करणारा कार्यकर्ता आहे. शहराच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. आपल्या कामाचा माणुस म्हणुन निमोणकर यांना संधी द्या व कोणाच्याही आमिषाला व  प्रलोभनाला बळी पडू नका व आपले बहुमोल मत घड्याळाला द्या.
    नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सुवर्णा महेश निमोणकर  यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ नगरसेवक निवडून द्या. शहराचा विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जामखेडचा विकास करून घेण्याची जबाबदारी आमची राहील असे आश्वासन  पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जामखेड शहरातील जनतेला संध्याताई सोनवणे यांनी दिले.

*चौकट*
महायुती म्हणून सभापती प्रा. राम शिंदे यांच्याशी चर्चा केली मात्र जागा वाटपाचा तिढा सुटला नाही, म्हणून स्वतंत्र लढणं ठरले. तरीही सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून प्रा. मधुकर राळेभात यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली असती तर आम्ही थांबलो असतो.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा