सौभाग्यवती नंदाताई प्रविण होळकर यांचा प्रभाग क्रमांक ७ मध्ये अनोखा उपक्रम

- Advertisement -spot_img

बालविद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जामखेड (प्रतिनिधी)

थोर देशभक्त बंकिमचंद्र चटर्जी लिखित आपल्या राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ ला सन २०२५ मध्ये १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने राज्य शासनाच्या वतीने ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून “आपली चिमुकली पिढी म्हणजे देशाचे उज्ज्वल भविष्य” या भावनेतून स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण होळकर व त्यांच्या सौभाग्यवती नंदा प्रविण होळकर यांनी प्रभाग क्रमांक ७ मधील एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत कान्होपात्रा नगर, जुने तपनेश्वर व संतोषी माता मंदिर येथील अंगणवाडी केंद्रांतील १०० बालविद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या प्रसंगी चिमुकल्यांना पाटी, वही, पेन्सिल बॉक्स, कंपास, टिफिन डबा, पाण्याची बाटली अशा विविध शैक्षणिक वस्तू देण्यात आल्या. साहित्य मिळताच मुलांनी आनंदाने जल्लोष केला. कार्यक्रमादरम्यान सर्वांनी ‘वंदे मातरम’ चे सामूहिक गीतगायन करून देशभक्तीची भावना जागवली.

या उपक्रमास स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण होळकर, नंदा होळकर, दळवी सर, बाबुजी माळवदकर, गोकुळ भस्मे, सागर बाबर, सचिन शास्त्रकार, विनोद पोले, आतिश कोळपकर, सुरज नागरगोजे, अक्षय शेळके, राहुल शिंदे, करण कळसकर, अल्ताफ शेख, तसेच अंगणवाडी सेविका उषा वारे, जयश्री उदावंत, रोहिणी चेमटे, बायडाबाई पवार, ललिता परदेशी, मीरा पवार व बालविद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.


प्रविण व नंदा होळकर यांनी घेतलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, हा उपक्रम ‘वंदे मातरम’च्या प्रेरणेने समाजात शिक्षण आणि देशभक्तीचा संदेश देणारा ठरला आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा