नऊ क्रमांक प्रभागातील नागरिकांच्या बैठकीत एकमुखी निर्णय

जामखेड प्रतिनिधी –
जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. नुकतीच मातोश्री मंगल कार्यालय, कर्जत रोड येथे झालेल्या भव्य बैठकीत प्रभागातील अनेक कार्यकर्ते, नागरिक, पदाधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ व प्रा.राम शिंदेचे साहेबांचे विश्वासू अर्जुन दादा म्हेत्रे यांना एकमताने “फिक्स नगरसेवक” म्हणून मान्यता देण्यात आली.

विषेश म्हणजे गणेश म्हेत्रे व मीना भोगे याही उमेदवारी करणार होते .पण सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे त्यांनीही अर्जुन दादा म्हेत्रे यांना जाहीर पाठिंबा दिला. व त्यांना विजयी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्णय घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक होते. सुरुवातीला प्रभागातील मागील पाच वर्षांचा विकास, अपूर्ण प्रश्न, तसेच नागरिकांच्या अपेक्षा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी सर्वांनीच अर्जुन दादा म्हेत्रे यांनी प्रभागासाठी केलेले सामाजिक कार्य, नागरिकांशी असलेले घनिष्ठ संबंध आणि त्यांच्या सततच्या जनसंपर्क मोहिमेचे कौतुक केले.
प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने निर्णय घेतला की, भाजपाकडून पक्षाचे अधिकृत तिकीट मिळाले तर अर्जुन दादा म्हेत्रे हे आमचे उमेदवार असतील व एकनिष्ठतेने लढतील आणि प्रभागातील जनतेचा विश्वास संपादन करतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी व्यक्त केला.

या बैठकीला तरुण कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी घोषणाबाजी करत “अर्जुन दादा म्हेत्रे आमचे नगरसेवक!” असा जयघोष केला. या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये निवडणुकीची रंगत वाढली असून, राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी उपस्थितश्रीधर (बापू )म्हेत्रे, बंडू (तात्या) म्हेत्रे, दीपचंद म्हेत्रे, संजय मेनकुदळे, अशोक म्हेत्रे, उत्तम म्हेत्रे, विश्वनाथ भोगे, आबासाहेब म्हेत्रे, विजय म्हेत्रे सर, माणिक म्हेत्रे, प्रल्हाद म्हेत्रे, आरिफ सय्यद, सुनील शिंदे, मिलिंद मोरे, शाबीर कुरेशी, दीपक टेकाळे, विशाल अब्दुल्ले, राजुभाऊ सदाफुले, शंकर बोराटे, राम शेंडकर, डाॅ भास्कर झगडे प्रकाश म्हेत्रे, चंदू म्हेत्रे, रमेश भोगे, यादव मेजर, कुंडलिक म्हेत्रे, सचिन घायतडक, करडकर नाना, गोकुळ म्हेत्रे, दीपक भोगे, वैभव म्हेत्रे, आदित्य रोकडे व समस्त वडाची वस्ती, अहिल्या वस्ती, फुलमळा, खडकवाडी, पोकळे वस्ती, काटकर वस्ती आदी प्रभागातील समस्त मोठ्या नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
जसे 2016 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने एकमताने डॉ. ज्ञानेश्वर झेंडे यांच्या पारड्यामध्ये मतदान टाकून त्यांच्या पाठीशी उभे राहिले तसेच यावेळेस ही (९) प्रभागातील जनतेने एकमुखाने व एकजुटीने अर्जुन (दादा) म्हेत्रे यांना पाठिंबा देत यावेळेस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा व त्यांच्या पारड्यामध्ये मतदान टाकण्याचा निर्णय घेतला आहे व त्यांना नगरसेवक या पदावर पोहोचविण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.


