
जामखेड प्रतिनिधी
नुकतेच जामखेड नगरपरिषद नगराध्यक्षा पदाचे अरक्षण जाहीर झाले आहे. आणि उद्या प्रभागाचे आरक्षण जाहीर होणार आहे.

बहुप्रतीक्षेनंतर जामखेड जामखेड नगरपरिषदेची निवडणूक होऊ घातले आहे. त्यामुळे ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर होणार आहे. याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 3 मधुन भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते शिवाजी (गुड्ड) विटकर हे भारतीय जनता पार्टी कडुन निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

गेल्या पंधरा वर्षांपासून शिवाजी (गुड्ड) विटकर हे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. तसेच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांचाच माध्यमातून विटकर यांनी प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनेक विकासकामे केली आहेत.

यामध्ये कुंभार गल्ली, सुतार गल्ली व महादेव गल्ली याठिकाणी रस्त्याचे मुरमीकरण करुन रहदारीस येणाऱ्या अडथळ्याची समस्या सोडवली आहे. तसेच टंचाईच्या काळात टॉंकरद्वरे पाणी पुरवठा करुन पाण्याची समस्या सोडवली. तसेच प्रभागातील सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यावर उपाययोजना करीत भुमिगत गटार करुन ठीक ठिकाणी चेंबर बांधले आहेत.

नवरात्र उत्सवात दरवर्षी तुळजाभवानी मातेचा पलंग नगरवरुन तुळजापूर कडे जात असतो. सातव्या माळेला हा पलंग जामखेड शहरात येत असतो. तालुक्यातुन व पलंगाबरोबर येणाऱ्या भाविकांच्या फराळाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शिवाजी (गुड्ड) विटकर हे करीत असतात.
त्यामुळे प्रभागातील मतदारांच्या आग्रहाखातर व प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जामखेड नगरपरिषदेची निवडणूक भारतीय जनता पार्टीकडुन लढविण्यास इच्छुक असल्याचे युवा कार्यकर्ते शिवाजी (गुड्ड) विटकर यांनी सांगितले.


