जामखेड शहरात तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या..

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

शिवाजीनगर भागातील एका पंधरा वर्षीय तरूणीने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही जामखेड पोलीस पुढील तपास करत आहेत.

याबाबत मयत मुलीचे चुलते मोहन विनायक गायकवाड वय 36 वर्षे धंदा हॉटेल व्यवसाय रा. मोहा ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी असे सांगितले की, समक्ष जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर होवुन फिर्याद लिहुन देतो की मी वरील ठिकानचा राहणार असुन घरात मी आई सुदंरबाई, वडील विनायक, भाउ सोमनाथ, असे आम्ही एकत्रीत राहणेस असुन मी तुळजाभवानी नावाचे हॉटेल चालवुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.

माझा मोठा भाऊ गणेश विनायक गायकवाड हा त्याचे कुटुंबासह शिवाजीनगर जामखेड ता. जामखेड येथे राहणेस आहे.

दि.05.09.2025 रोजी सायंकाळी 06.00 वा चे सुमारास मी मोहा ता जामखेड येथे घरी असताना मला आमचे नातेवाईक तुकाराम भोरे यांनी फोन करुन सांगितले की तुझी पुतणी भक्ती गणेश गायकवाड वय 15 वर्षे रा. शिवाजीनगर जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर हीने राहते घरी ओढणीचे सहाय्याने गळफास घेतला असुन आम्ही तीला खाली उतरुन घेतले आहे

तीला उपचारकरीता ग्रामीण रुग्णालय जामखेड ता. जामखेड येथे घेवुन जात आहोत तरीतु ताबडतोब ये असा फोन आल्याने मी ताबडतोब ग्रामीण रुग्णालय जामखेड ता. जामखेड येथे आलो त्यावेळी तेथील डॉक्टर यांनी पुतणी भक्ती गणेश गायकवाड वय- 15 वर्षे रा. शिवाजीनगर जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर हीस तपासुन ती मयत असल्याचे सांगितले.

अशा प्रकारे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वरील घटनेचा तपास जामखेड पोलीस करत आहेत.

आत्महत्येमुळे शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आईचे ब्युटी पार्लर चे बाजार तळ येथे दुकान होते अशी माहिती कळली आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा