गुन्हेगारी मुक्त जामखेड करण्यासाठी कारवाई चालूच राहणार – पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी

जामखेड प्रतिनिधी –
वाढती गुन्हेगारी अवैध धंद्यांच्या विरोधात जामखेड पोलीसांनी धडक मोहीम सुरू केली आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी व अवैध धंद्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे याच अनुषंगाने जामखेड व परिसरात सर्रास ट्रिपल सीट, कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न, गाड्या रेस करणे, विना परवाना गाडी चालवणे, शाळा कॉलेज परिसरात गाड्या रेस करणे चालू होते.

नवनियुक्त पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली. आणी त्यांनी कारवाईला सुरूवात केली आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांकडून का बऱ्याच नियमबाह्य गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत विशेषतः बुलेट मोठ्या आवाजाचा सायलेंसर बसवलेल्या बऱ्याच बुलेट गाड्या जप्त करत जामखेड पोलीस स्टेशनला आणून कागदपत्रे तपासणी करत या वाहनचालकांना दंड ठोठावला आहे या कारवाईचे जामखेड च्या नागरिकांनी स्वागत केले आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार ही मोहीम खर्डा चौकात राबविण्यात आली आहे. गुन्हेगारीमुक्त जामखेड करण्यासाठी आता कारवाई सुरू रहाणार आहे.



