नागेश्वराची यात्रा शांततेत साजरी करा! पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध : पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी.

- Advertisement -spot_img

पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले जामखेडकरांना अवहान..

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहराचे ग्रामदैवत श्रीनागेश्वराचा यात्रा उत्सव धार्मिक कार्यक्रमांनी नुकताच सुरु झाला नागपंचमी व सकरोबा या दोन दिवसात मुख्य यात्रा होत आसते त्यामुळे राज्यभरातुन मोठ्या प्रमाणावर नागरिक जामखेड शहरात येत आसतात त्यामुळे वाहतूक कोंडी, चोरी, महिलांची सुरक्षा व कायदा सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

याच आनुशंगाने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी जामखेडकरांना अवहान केले आहे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की हा यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी 7 पोलीस अधिकारी व 80 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. या यात्रेचा सर्व नागरिकांनी आनंद घ्यावा. यात्रे दरम्यान कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी योग्य त्या ठिकाणी पार्किंग करावेत व वाहतूक नियमांचे पालन करावे. यात्रेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आढळून आल्यास त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कुस्ती हंगामा, नर्तकींचे कार्यक्रम, आनंदनगरी, पालखी सोहळा या ठिकाणी देखील बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

यात्रा उत्सवा दरम्यान कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी शहरात व यात्रा उत्सव ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तरी यात्रा उत्सवादरम्यान सर्व नियमांचे पालन करून यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा