झांज लेझीम पथकाच्या जल्लोषात कर्मवीर जयंती साजरी

- Advertisement -spot_img

मिरवणुकित विद्यार्थ्यांची 900 मीटर लांब रांग

जामखेड प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ,थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील (डिलीट) यांचा जयंती सोहळा जामखेड मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय ,ज्युनिअर कॉलेज, कन्या विद्यालय जामखेड यांचे संयुक्त विद्यमाने कर्मवीर जयंती अतिशय उत्साहात  संपन्न झाली यावेळी डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची मूर्ती व कर्मवीर रथाचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली.सर्व पथकांनी कर्मवीर रथास मानवंदना दिली

     मिरवणुकीचे वैशिष्ट्ये
एनसीसी ध्वज पथक ,लेझीम पथक झांज पथक,मुलींचे टिपरी व लेझीम पथक,कर्मवीर दिंडी,कलश पथक,ढोल पथक,कर्मवीर रथ नागेश व कन्या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी,रयत सेकव व ग्रामस्थ भव्य अशा मिरवणूकीत सहभागी झाले होते

प्रमुख उपस्थिती स्थानिक स्कूल कमिटी सदस्य प्रा मधुकर राळेभात,प्रकाश सदाफुले,विनायक राऊत,प्राचार्य मडके बि के ,मुख्याध्यापिका भोर आर आर,कुंडल राळेभात,शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे,अशोक यादव , उपमुख्याध्यापक नाळे एस.के  पर्यवेक्षक जाधवर एस व्ही,पर्यवेक्षक संजय हजारे,एनसीसी ऑफिसर मयूर भोसले,दिलीप ढाळे,मोहन यादव ,कैलास वायकर, सुग्रीव ठाकरे,अशोक घोडके, मांडे एस एस आजी माझी रयत सेवक ,शिक्षक, पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.

मिरवणुकीचा मार्ग- नागेश विद्यालय- आदित्य मंगल कार्यालय कॉर्नर- बीड रोड -बीड कॉर्नर -जय हिंद चौक- खर्डा चौक -तपनेश्वर रोड- मिलिंद नगर- डॉक्टर आंबेडकर स्मारक- भुतवडा रोड- नागेश विद्यालय येथे समारोप झाला .
मिरवणुकित विद्यार्थ्यांची 900 मीटर लांब रांग होती.

कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो, रयतेचा राजा कर्मवीर माझा ,स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ,रयत माऊली वटवृक्षाची सावली, कर्मवीर आले दारोदारी शिक्षण झाले घरोघरी , रयत शिक्षण संस्थेचा विजय असो,  अशा घोषणेने जामखेड शहर परिसर दुमदुमून निघाला यावेळी ग्रामस्थांच्यावतीने ठिकठिकाणी कर्मवीरांचे पूजन करण्यात आले.

कन्या विद्यालय पथके सौ सळूके एम बी, श्रीम लोंढे एस ए,श्रीम पवार पी पी, श्रीम नवले व्ही ए,श्रीम शेळके एस बी, व नागेश विद्यालय पथके एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांचे मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले शेवटी आभार प्रदर्शन प्राचार्य मडके बी के यांनी केले

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा