संस्कृती टिकवण्यासाठी कथा किर्तनाचे आयोजन करण्यात येत आसते:विकास महाराज वायसे..

- Advertisement -spot_img

जमादारवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तीमय वातावरणात आहे सुरू

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जमादारवाडी आखंड हरिनाम सप्ताह सुरू आसुन दुसऱ्या दिवशीची किर्तनसेवा विकास महाराज वायसे शास्त्री वारकरी शिक्षण संस्था लोणी फाटा यांची संपन्न झाली

या प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या
दुरकु आंबोला केला गे बाई
ब्रम्हादिकां तो न पडे ठाई!!
हालों नये चालों नये!
सैरावैरा काही बोलों नये!!

या आभंगावर चिंतन मांडत आसताना सांगितले की आपण एकदा का परमेश्वराला आपलंस मानले की आपली सर्व काळजी तो घेत आसतो पत्नीने पतीच्या नावाच मंगळसूत्र गळ्यात घातलं की पत्नीची सर्व जबाबदारी पतीला आयुष्यभर घ्यावी लागती आसा दृष्टांत देत चिंतन केले

पुढे बोलताना महाराज म्हणाले की आपली संस्कृती धर्म टिकवण्यासाठीतर कथा किर्तन सप्ताहांचे आयोजन करण्यात येत तरुणांचा  धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग गरजेचा आहे


तसेच आज आपल्या देशात वृध्द आश्रम काढले जात आहेत त्यामुळे पुढच्या पिढी संस्कार हीन होत आहे याचेच प्रबोधन महाराज मंडळींनी किर्तनातुन करावे असे सांगितले

संस्थेतील चिमुकल्या वारकर्‍यांनी मृदंग टाळ धरलेला ठेका व छोट्या वारकर्‍याने मृदुंग वादनाने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले
किर्तनानंतर सर्व भाविकांच्या भोजनाची व्यवस्था संत एकनाथ महाराज सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली होती

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा