सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या सातबाराला आधार लिंक करावे :तहसीलदार गणेश माळी

- Advertisement -spot_img

आन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नसुन,पिएम किसानचे पैसेही होणार बंद!

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तहसीलच्या वतीने तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना हे अवाहान करण्यात आले आहे तसेच या योजनेची जनजागृती व्हावी म्हणून गावपातळीवर दंवडी देऊन त्याचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे..
जाहीर दवंडी
सर्व शेतकरी बंधूना सूचना
जामखेड तालुक्यातील सर्व ८७ महसुली गावातील सर्व ७/१२ धारक शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते कि, अँग्रीस्टॅक योजने अंतर्गत आपला ७/१२ आधारला लिंक करावयाचा आहे. जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आयडी मिळेल. ज्याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला या‌द्वारे घेता येईल. जर आपण आपला फार्मर आयडी बनविला नाही तर आपल्याला पुढील कृषी योजनांविषयक लाभमिळणार नाही तसेच पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते फॉर्मर आयडी बनवल्यानंतरच मिळतील त्यासाठी जवळच्या नागरीक सुविधा केंद्र, ग्रामपंचायत संग्राम सुविधा केंद्र, आपले सरकार सुविधा केंद्र याच्याशी संपर्क साधावा. व आपल्या ७/१२ ला आधार लिंक करून घ्यावे व फार्मर आयडी बनवून घ्यावा. (सदरील सेवा मोफत उपलब्ध आहे.)

त्यासाठी खालील कागदपत्रे सोबत घेऊन जावेत.

१. आधारकार्ड.

२. आधार लिंक मोबाईल क्रमांक.

3. सर्व ७/१२ व ८ अ उतारे

(टीप:- आपला मोबाईल नं आधार कार्ड शी लिंक केलेला असणे आवश्यक आहे.)
प्रतः- सर्व महसुल सेवक (कोतवाल) तालुका जामखेड आपल्या गावामध्ये सदरिल दवंडी देण्यात यावी. व केलेल्या कार्यवाहीचा तपशिल उलट टपाली या कार्यालयास सादर करावा.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा