आहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातील धुरंधर नेता काळाच्या पडद्याआड..
जामखेड प्रतिनिधी
भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव भानुदास कर्डीले यांचं निधन झाले असून वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 67 वर्षे होते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास हा बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून आमदारकीपर्यंत झपाट्याने घडलेला होता. त्यांचा मूळ व्यवसाय दूध व्यवसाय असला तरी समाजातील कार्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणात स्थान निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत.
शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते. नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले. शिवाजी कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
आणी 2024 ला त्यांनी पुन्हा विजय मिळविला होता दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता.


