आ. रोहीत पवार यांनी संधी दिल्यास सौभाग्यवती नगराध्यक्षा पदाची निवडणूक लढविणार – डॉ. प्रशांत गायकवाड

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील शिलादिप हाॅस्पीटलचे संचालक डॉ. प्रशांत गायकवाड यांच्या सौभाग्यवती डॉ. पल्लवी प्रशांत गायकवाड या येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नगराध्यक्षा पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. आ. रोहित पवार यांनी संधी दिली तर नगराध्यक्षा पदासाठी निवडणूक लढणार आहेत.

तसेच नगराध्यक्षा झाल्यास तरुणांना रोजगार, आरोग्यसेवा व जामखेड शहराचा विकास करुन चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाईल असे मत डॉ. प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केले.

सुशिक्षित तरूणांनी एकत्र येत समाजाच्या उन्नतीसाठी वज्रमूठ बांधुन शहराचा सर्वांगीण विकास करू अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. जामखेड शहर अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे रस्ते, वीज, पाणी आरोग्य, स्वच्छता अशा मुलभूत सुविधांचाही आभाव शहरात जाणवत आहे. डॉ. पल्लवी गायकवाड या नगराध्यक्षा झाल्यास आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून लवकरच एमआयडीसी चा प्रश्न मार्गी लावुन तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहोत. फक्त एका प्रभागापुरते न पहाता संपुर्ण जामखेड शहराचा विकास कसा होईल हे पहाण्यात येईल.

डॉ. पल्लवी प्रशांत गायकवाड या एक सुक्षिक्षित व सुसंस्कृत चेहरा असल्याने तरुणांची फळी उभी करुन जामखेड शहराचा विकास करण्याचा मानस आहे. यामध्ये प्रथम शहरातील सुक्षिक्षित तरुण व एकल महीलांच्या हाताला काम कसे उपलब्ध होईल हे प्रामुख्याने पहाण्यात येईल. आ. रोहित पवार यांनी माझ्या सौभाग्यवती डॉ पल्लवी गायकवाड यांना नगराध्यक्षा पदाची उमेदवारी दिल्यास सक्षमपणे सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करु असे देखील डॉ. प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.

आ.रोहित पवार व खा. निलेश लंके हे आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करत असुन विकासाचे व्हिजन असणारे नेते आहेत. आ. रोहित पवारांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. आणि आ. रोहित पवार हे आपल्या तरुण तडफदार युवकांचा आयडाॅल असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली तरूणांची फळी राजकारणात एकत्र करून जामखेड शहराचा विकास घडवु या अशी भावना डॉ. प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा