नवरात्रीत भाविकांच्या सुखसोयीसाठी मंदीर परिसर सुसज्ज.

जामखेड प्रतिनिधी –
मिलींदनगर येथील जय तुळजाभवानी मंदीराचे काम गेली अनेक दिवसांपासुन प्रलंबित होते आणि लवकरच कुलस्वामिनी जगदंबेचा नवरात्री हा उत्सव जवळ आला आहे त्यामुळे मंदिर व परिसराचा जिर्णोधार तसेच मंदीराचा स्लॅब व परिसरातील विकास कामे थांबलेले होते ही आडचण मिलींदनगर परीसरातील नागरीकांनी युवा उद्योजक आकाश बाफना यांना सांगितली आणी त्यांनी लगेच मिलिंदनगर येथे पाहणी केली

आणी मंदिर व परिसराचे काम पूर्ण करण्यासाठी मिलिंदनगर येथील नागरिकांना निधी उपलब्ध करून दिला आहे आणी नवरात्रीपर्यंत काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी दिला आहे.

तसेच मंदिर जिर्णोद्धार व परिसर विकास हा नवरात्रीच्या पुर्वी झाला पाहिजे आणी भाविक भक्तांना सुविधा उपलब्ध झाली पाहिजे यामुळे निधी हा मंदीराचे पुजारी श्रीरामदास गायकवाड यांच्या कडे त्वरीत सुपूर्त केला.

यावेळी आदर्श फाऊंडेशनचे.अध्यक्ष आकाश दिलीपजी बाफना,शिवा संघटनेचे जिल्हा शिवकुमार डोंगरे सामाजिक कार्येकर्ते किरण वडे, धिरज चव्हाण, रामदास गायकवाड,आरीफ शेख, बांबु गायकवाड,आण्णा पवार,बाबासाहेब साठे, बाबासाहेब सदाफुले,संदीप गायकवाड, रिजवान शेख,रमेश गायकवाड आवनी गायकवाड,विलास गायकवाड, आबा समुद्र,निलाबाई गायकवाड, आशाबाई समुद्र,आस्मा शेख, सलमा शेख, मंगल गायक आदी मिलिंदनगर येथील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



