राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा. मधुकर(आबा) राळेभात करणार आपली राजकीय भूमिका स्पष्ट.
जामखेड प्रतिनिधी
कर्जत जामखेड मतदारसंघात गेली अनेक वर्षे राजकिय सामाजिक क्षेत्रात प्रा. मधुकर आबा राळेभात हे काम करत आहेत १९९० सालापासून त्यांनी आपल्या राजकीय जिवनाची सुरूवात केली १९९७ साली प्रा. राळेभात यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती परंतु त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता पुन्हा जोमाने राजकीय क्षेत्रात काम करत २००७ साली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय मिळविला त्या नंतर २००९ साली कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत प्रा. राळेभात यांनी मोठी लढत दिली अपक्ष उमेदवार करत तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा त्यांच्या राजकीय जिवनात मोठा प्रभाव राहिला पंचवीस वर्षे त्यांनी शिवसेना पक्षाचे काम पाहिले व तळागाळापर्यंत पक्षाचा कार्यकर्ता निर्माण केला

त्यानंतर राजकीय भूमिका बदलत
गेली आठ वर्षांपासून त्यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी मतदारसंघात पिंजून काढला गोरगरिबांच्या सेवेसाठी आबा नेहमी तत्पर असतात तळागाळापर्यंत त्यांचा दांडगा जनसंपर्क पहावयास मिळतो राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात आबांचे मतदारसंघात मोठे योगदान आहे
प्रा. राळेभात यांनी सात महिन्यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याकडे दिला होता परंतु त्या ठिकाणी दुसरी कुणाची नियुक्ती करण्यात आली नसल्याचे आबांच्याकडेच ती जबाबदारी आहे
येत्या पंचवीस तारखेला प्रा. मधुकर आबा राळेभात राजकीय भूमिका घेणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघात राजकीय भुकंपतर होणार आहे त्यामुळे कुणाला याचा फटका बसणार आणि कुणाची ताकद वाढणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे
तरीपण प्रा. मधुकर आबा राळेभात काय राजकीय भूमिका स्पष्ट करताहेत याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.


