नुतन वर्षाचा नुतन संकल्प,हरित जामखेडसाठी प्रयत्न करणार:प्रा. कैलास माने

- Advertisement -spot_img

“स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड” ही संकल्पना घेऊन राजकारणात पदार्पण केले:प्रा. कैलास माने.

जामखेड प्रतिनिधी
नुकतीच जामखेड नगरपरिषदेची निवडणूक झाली भाजपा दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना वंचित बहुजन आघाडी व काँग्रेससह सर्वच पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविली यामध्ये शिवसेनेच्या एकमेव उमेदवार वर्षा कैलास माने यांनी बाजी मारली. 2010 साली ग्रामपंचायतीत प्रा कैलास माने यांनी सरपंच म्हणुन जामखेड शहराचे नेतृत्व केले होते

प्रथमच “स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड हरित जामखेड” ही संकल्पना घेऊन त्यांनी ती करून दाखवली होती ठिकाणी ठिकाणी लोखंडी कचराकुंड्या ठेवुन रोजच्या रोज कचऱ्याची विल्हेवाट लावली जात होती त्यामुळे रस्त्यावर कचरा साठत नव्हता त्यामुळे परिसर स्वच्छ रहात होता

तसेच जामखेड शहराच्या बाजार पेठेच्या दृष्टीने महत्त्वाचे आसे निर्णय प्रा.माने त्याकाळी घेतले त्या पैकी लोकसहभातुन आग्निशामक बंब,आरोग्यसेवेसाठी अ‍ॅम्ब्युलन्स आल्याने आनेक नागरीकांचे प्राण वाचले,तसेच ग्रामपंचायतचे कार्यालय मोडकळीस आले होते पावसाळ्यात तर गुडघाभर पाणी कार्यालयात व सभोवताली साठत आसे यासाठी त्यांनी भव्य व सुसज्ज तीनमजली इमारत बांधुन ती कार्यकाळातच पुर्ण केली आजही याच ठिकाणी नगरपरिषदेचे कामकाज सुरू आहे.

माझ्या स्वप्नातील हरित जामखेड ही संकल्पना आर्धवट राहिली आहे ती येत्या पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रभावीपणे राबविण्यासाठी नगरपरिषदेतील सभागृहात प्रभावीपणे हा विषय मांडणार आसुन हरित जामखेड करणार तसेच दुर्गा माता मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणे हाच आमचा नविन वर्षाचा संकल्प आसल्याचे प्रा.कैलास माने यांनी सांगितले आहे..

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा