जामखेड शहरातील विंचरणा नदीला पुर,
दगडी पुल गेला पाण्याखाली..

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात तसेच घाटमाथ्यावर गेली दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने जामखेड शहरातून वाहणाऱ्या विंचरणा नदीला पूर आलेला आहे या नदीवरील दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे

मागील काही दिवसांपासून जामखेड तालुक्यात या पावसामुळे नदी नाले ओढे तुडंब भरलेले आहेत जामखेड शहराला वरदान ठरणारा भुतवडा तलाव मागील काही दिवसापूर्वीच ओव्हर फ्लो झालेला आहे तसेच तालुक्यातील खैरी प्रकल्प मोहरी प्रकल्प तुडुंब भरलेले आहे जोरदार पाऊस पडत असल्यामुळे जामखेड शहरातून वाहणारी विंचरणा दुथडी वहात आहे

विंचरणा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी जामखेड शहरातील नागरिकांनी आज सकाळी मोठी गर्दी केलेली होती यावेळी पंचायत समिती मा. सभापती डॉ भगवान मुरूमकर व कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती मा. शरद कार्ले यांनीही पाहाणी केली आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की

जामखेड तालुक्यातील चांगला पाऊस झाला आहे विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे साहेब हे जलसंधारण मंत्री आसताना तालुक्यात जलसंधारणाची फार मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत त्यामुळे या पावसाचे पाणी तालुक्यात बंधारे नदी खोलीकरणाच्या माध्यमातून साठविले जाऊन शेतकर्यांना त्याचा फायदा होत आहे
त्यामुळे रब्बी पिकांचे चांगले उत्पन्न होईल आशी आपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे



