उपसभापती कैलास वराट यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल

- Advertisement -spot_img

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन संचालकांनी सोडली आ. रोहित पवार यांची साथ.

जामखेड प्रतिनिधी
कर्जत-जामखेड मतदारसंघात
दोन वर्षांपूर्वी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोहित पवार गटाचे नऊ व सभापती नामदार प्रा राम शिंदे साहेब यांचे नऊ संचालक निवडून आलेले असताना मागील वेळी ईश्वर चिट्ठीने भारतीय जनता पार्टीचा विजय झाला होता विजयाच्या रूपाने शरद पंडित कार्ले हे सभापती पदी विराजमान झाले होते व उपसभापती पदी आ.रोहित पवार गटाचे कैलास वराट  यांची निवड झालेली होती.

परंतु मागील दोन वर्षांमध्ये आ.रोहित पवार गटाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेळोवेळी विकास कामांना अडथळे आणल्यामुळे आ. रोहित पवार गटाचे तीन संचालक अंकुश ढवळे ,राहुल बेदमुथा व नारायण जायभाय यांनी जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सभापती नामदार प्रा राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतल्याने

आज अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे उपसभापती यांच्यावर 18 पैकी 12 संचालकांनी सह्या करून अविश्वास ठराव दाखल केला.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा