प्रत्येक शेतात चिखल व पाणी,बांधावर जाऊन कर्मचारी करताहेत पंचनामे

जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषदेचा हद्दीतील धोत्री येथील २५० शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत तर जामदारवाडी येथील २००पूर्ण झाले आसुन धोत्री व जमादारवाडी या दोन्ही गावांचे पंचनामे शेतकऱ्याच्या बांधावर ग्राम महसुल अधिकरी वैजिनाथ मिसाळ व कृषी साह्यक राणीताई चव्हाण यांनी पूर्ण केले आज पासुन या समितीने बटेवाडी व चुंभळी या गावात पंचनामे सुरू केले आसल्याची माहिती समितीचे प्रमुख वैजिनाथ मिसाळ यांनी दिली आहे

जामखेड शहर व तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन,तुर,लागवड केलेला कांदा ऊस, साठवलेला कांदा, सोलर सिस्टीम यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. रोहीत पवार यांनी तालुक्यातील अतिनुकसान झालेल्या भेटी देऊन संवाद साधला तर तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतात उभे राहायचे झाले तर गुडघाभर पाय आत जातात. त्यामुळे पिकाचा पंचनामे करणारे कृषी सहायक, कामगार तलाठी व ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पडीक जमीन वगळता सरसकट पंचनामे केली जात आहे.
जामखेड शहर व तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेला खरीपाचा घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. शहर व तालुक्यात नदी नाले ओढे यांचे पात्र पाण्याच्या दबावामुळे बदलले आहे.

त्यामुळे नदीकाठावरील शेती पिकांसह पूर्ण उध्दवस्त झाली आहे. तर इतर शेती ऊफाळली आहे. काही शेतात पिके उभे आहेत पण त्यामध्ये जायचे असेल तर गुडघाभर चिखलात उभे रहावे लागते. त्यामुळे पंचनामा करणा-या त्रिसदस्यीय समितीपुढे आव्हान निर्माण झाले आहे. काही ठिकाणी वरून चांगले असलेले पिके पिवळी पडली असल्याने नुकसानप्राप्त ठरले आहे.

अतिवृष्टीमुळे शासकीय त्रिसदस्यीय समिती कृषी सहायक, कामगार तलाठी, ग्रामसेवक हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. जामखेड तालुक्यातील खरीपचे 63946 हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. यामध्ये उडीद 24600 हेक्टर, सोयाबीन 23285 हेक्टर, तुर 8300 तर इतर क्षेत्रात ऊस, कांदा लागवड झालेली आहे. सोयीबीन, उडीद हे नगदी पिके काढण्यासाठी आले होते. आता ते पूर्ण वाया गेले आहे व गुडघाभर पाण्यात आहे. एवढी परवड शेतकऱ्यांची कधी झाली नाही.
शेतीपिकाच्या नुकसानीबरोबरच तयार केलेले पांदण रस्ते, गाडीवाट, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग वाहून गेले आहेत. तसेच तालुक्यातील सर्वच छोटे, मोठे बंधारे, यांच्या लगतच्या जमिनी व रस्ते वाहून गेले असल्याने याचे पंचनामे करून सरकारने दुरूस्ती करावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत शासकीय दरबारी नोंद होणे आवश्यक आहे.


