गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद निमित्ताने  जामखेड येथे तहसील कार्यालयाच्या सभागृहात शांतता कमिटी मिटींगचे आयोजन…

- Advertisement -spot_img

डीजे न वापरता पारंपारीक वाद्याचा वापर करावा — पोलीस उपअधीक्षक प्रवीणचंद लोखंडे

जामखेड  प्रतिनिधी

डीजे वाद्यावर बंदी  असल्याने , डीजे न वाजवता पारंपारीक वाद्याचा गणेश मिरवणूकीत वापर करावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे तहसील कार्यालयाच्या सभागृहात शांतता मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रवीणचंद लोखंडे बोलत होते.यावेळी पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदिप कटकदौंड, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संभाजी कोकाटे, स्थापत्य अभियंता अमीर शेख,जेष्ठनेते प्रा मधुकर राळेभात, नगरसेवक अमीत चिंतामणी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा कैलास माने, राष्टवादी(शरदचंद्र पवार पक्ष) मंगेश दादा आजबे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, सलीम बागवान, प्रा.विकी घायतडक,मनसेचे प्रदिप टापरे, शिवप्रतिष्ठान तालुकाप्रमुख पांडूराजे भोसले, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नय्युमभाई सुभेदार, नगरसेवक मोहन पवार,नगरसेवक गणेश आजबे, विकीभाऊ सदाफुले,बिट्टू मोरे, शुभम धनवडे यांच्यासह पोलीस पाटील व  अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस उपअधीक्षक लोखंडे म्हणाले, प्रत्येक गणेश मंडळांनी रस्त्यावर मंडप उभारताना रस्त्याच्या एक तृतीयांश जागेतच मंडप उभारावा. त्यापेक्षा जास्त जागा व्यापनार नाहीत असे नियोजन करावे.यासाठी नगर परिषद आणि पोलीस स्टेशन यांनी लक्ष द्यावे.मंडळांनी सिसीटीव्ही ची व्यवस्था करावी.गणेश विर्सजन ठिकाणी नगरपरिषदेने पुरेशी प्रकाश व्यवस्था करतानाच, याठिकाणी चांगले पोहोणारे व जीवरक्षक नेमावे असे आवाहन त्यांनी केले.

जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात म्हणाले, गणेशोत्सावात वाहतुक कोंडी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.यासाठी खर्डा  चौक ते बीड काॅर्नर दरम्यान रस्त्यावर लागणारे गणपती मुर्तीचे स्टाॅल जुन्या तहसील कार्यालयासमोर लावावेत.अशी सुचना केली.नगरसेवक अमीत चिंतामणी यांनी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील विद्युततारांची उंची वाढवण्याची मागणी केली. जेणेकरून संभाव्य दुर्घटना टळली जाईल.अशी सुचना मांडली आहे.

चौकट

पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनीही येणारा गणेशोत्सव ईद-ए-मिलाद व नवरात्र हे खूप महत्त्वाचे सण आहे जसे यात्रेला आपण सर्वांनी सहकार्य केले तसेच आपल्या कडून या उत्सवाला पण सहकार्य असावे अशी अपेक्षा मला आहे.आपण ते करणार या जामखेडची जी ख्याती आहे ती कायम राहणार याची मला खात्री आहे यावेळी सांगितले.

चौकट –

राष्टवादीचे मंगेश दादाआजबे यांनीही ग्रामीण भागात एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगत, याकामी त्या गावच्या पोलीसपाटलांची भुमिकाही महत्वाची असल्याचे त्यांनी सांगीतले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा