प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांचा वाढदिवस आनंदाचा सोहळा न राहता समाजासाठी कल्याणकारी कार्याचा दिवस – विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे

- Advertisement -spot_img

सामाजिक उपक्रमांनी प्रा. राळेभात यांचा वाढदिवस साजरा..

जामखेड प्रतिनिधी

प्रा.मधुकर (आबा) राळेभात यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रवास अत्यंत समृद्ध आणि प्रेरणादायी आहे.

महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करताना त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञान, संस्कार आणि मूल्यांचे बीजारोपण केले. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासातच नव्हे तर समाजाभिमुख विचार करण्याची दृष्टी दिली. त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी असंख्य कार्यकर्ते वाढदिवसानिमित्त आले आहेत ही त्याची पोचपावती आहे. राळेभात यांचा वाढदिवस आनंदाचा सोहळा न राहता समाजासाठी कल्याणकारी कार्याचा दिवस आहे असे
प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी केले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात यांचा ६३ वा वाढदिवस महावीरभवन येथे सोमवारी रात्री साजरा करण्यात आला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड अरूण जाधव बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, आजीनाथ हजारे, डॉ. भगवान मुरूमकर, रवींद्र सुरवसे, मनोज कुलकर्णी, नगरसेवक अमित चिंतामणी, अमित जाधव, बापूराव ढवळे, प्रवीण घुले, दत्तात्रय वारे, शहाजीराजे भोसले, खर्डा सरपंच संजीवनी पाटील, अजहर काझी, राहूल उगले, आकाश बाफना,दिगांबर चव्हाण,संध्या सोनवणे,मोहन पवार,विकी घायतडक,गफ्फारभाई पठाण,गणेश डोंगरे, महालिंग कोरे, आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे म्हणाले, प्रा. मधुकर राळेभात जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि शेतकरी कल्याण या सर्वच क्षेत्रांत प्रभावी योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक गावांच्या विकासाला गती मिळाली. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २०० जणांनी मोफत आरोग्य तपासणी व ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली. या उपक्रमामुळे त्यांचा वाढदिवस केवळ आनंदाचा सोहळा न राहता, समाजासाठी कल्याणकारी कार्याचा दिवस ठरला.

या अभिष्टचिंतन सोहळ्यास, भारतीय जनता पार्टीसह विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध संस्थेचे आजी – माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, जामखेड ग्रामस्थ व प्रा.मधुकर आबा राळेभात यांचा मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होता.

चौकट
२००९ विधानसभेला तीन हजार मते माझ्यापेक्षा जास्त
—————————————-
प्रा. मधुकर राळेभात व मी यापूर्वी प्राध्यापक होतो. राजकीय पक्ष जरी वेगळे असले तरी राजकारणात बरोबर होतो. पण २००९ ला ते माझ्या विरोधात विधानसभेला उभे राहून जामखेड तालुक्यातून तीन हजार मते जास्त घेतले यावरून त्यांचा जनतेप्रती असलेले प्रेमाचे नाते चांगले होते. तीन वर्षांपूर्वी मी त्यांच्या वाढदिवसाला न बोलवता घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तर दुसऱ्या वेळी ते माझ्या बरोबरच आले आणि आता तर ते संबध आणखी दृढ झाले. मी
पहिल्यांदा आमदार दुसर्‍यांदा मंत्री व तिसऱ्या वेळी पडलो पण वरीष्ठ पातळीवर असलेले राजकीय संबध यामुळे विधानपरिषदेचे सभापती पद मिळाले. विधानपरिषदेचा मी सातवा व कमी वयात झालेला सभापती आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा