प्रभाग क्रमांक पाच 5 मधून सुशिक्षित नवा चेहरा समोर

- Advertisement -spot_img

प्रभाग 5 मध्ये नवा चेहरा म्हणून, प्रा. सौ. पुजा बाळासाहेब भालेराव-गडकर यांचे नाव पुढे

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जामखेड शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनुसूचित जमाती जागेवरून एक सुक्षिक्षित चेहरा म्हणून प्रा. सौ. पुजा बाळासाहेब भालेराव-गडकर यांचे नाव पुढे आले आहे. सध्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी त्या प्रबळ दावेदार ठरत आहेत. त्यामुळे राजकारणाच्या पटलावर एक सुक्षिक्षित चेहरा समोर येत असल्याचे दिसून येत आहे.

उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत अशा प्रा. सौ.पुजा भालेराव-गडकर या समाज कार्यात देखील सक्रिय आहेत. विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग नोंदवत तरुणाई समोर एक आदर्श ठेवला आहे

. जामखेड शहरा बरोबरच प्रभाग क्रमांक 5 मधिल विकास कामात सहभागी होण्याची त्यांची तयारी आणि सकारात्मक दृष्टी यामुळे त्यांचा चेहरा शहरासाठी नवा बदल म्हणून लोकांमध्ये चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे प्रा.सौ. पुजा भालेराव-गडकर यांच्या कडे सुशिक्षीत चेहरा म्हणुन पाहिले जात आहे.

जामखेड नगरपरीषदेच्या निवडणुकीत आपल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये स्वच्छता पाणीपुरवठा, आरोग्य व लाईटच्या आशा विविध सुविधांना प्रथम प्राधान्य असलेला सुक्षिक्षित चेहरा म्हणून ओळख असलेल्या प्रा.सौ. पुजा बाळासाहेब भालेराव-गडकर या अनुसूचित जमाती मधुन निवडणुक लढण्यासाठी दावेदार ठरत आहेत. विशेष म्हणजे मागील 15 वर्षांपासून प्रा.सौ पुजा भालेराव-गडकर या ल.ना. होशिंग माध्यमिक विद्यालयात सह शिक्षिका म्हणून नोकरीस असून, महादेव कोळी या आदिवासी संवर्गातून आहे, सुशिक्षित असल्याने नगरपरिषदेत नगरसेवक या पदाची कार्यांची माहिती असून  प्रभागातील पाणी पुरवठा, रस्ते, खेळ मैदान, स्वच्छता, आरोग्य व विद्युत सेवा नागरिकांना मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार आणि प्रभागातील नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. जामखेड च्या आगामी नगरपरीषदेच्या निवडणुकीत जामखेड शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनुसूचित जमाती जागेवरून एक सुक्षिक्षित चेहरा म्हणून प्रा.सौ. पुजा बाळासाहेब भालेराव-गडकर यांचे नाव पुढे आल्याने शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसुन येत आहेत.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा