जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण झाले जाहीर

- Advertisement -spot_img

महिलांचा खुला प्रवर्गासाठी निघाले आरक्षण,प्रथमच जनतेतून होणार नगराध्यक्ष..

जामखेड प्रतिनिधी
आज राज्यातील नगरपालिका नगरपरिषदांचे नगराध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत घोषीत झाली आणी जामखेड नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण निघाले याबाबत जामखेडकरांना कोणतं आरक्षण पडणार या बाबत मोठी उत्सुकता लागली होती

जामखेड नगरपरिषद स्थापनेनंतर आता होणारी ही दुसरी पंचवार्षिक निवडणूक होणार त्यातच आता जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आसल्याने याबाबत राजकीय पक्षांचीही कसोटी लागणार आहे कारण नगरसेवक पदाचा उमेदवार सर्व प्रभागात परिचित व संपर्क आसणारा द्यावा लागेल यापूर्वी एकाच प्रभागापुरते कार्यक्षेत्र मर्यादित होते.

आणि आता मतदारांनाही एक नगराध्यक्ष व दोन नगरसेवकांना मतदान करावयाचे आसल्याने मतदारांसाठी ही निवडणूक नवखी आसणार आहे

आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवार आता थोड्याच दिवसात कामाला लागतील तर काही उमेदवारांनी आगोदपासुनच नगरपरिषद कार्यक्षेत्रातील आडी आडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन जनसंपर्क वाढवला आहे तर काही इच्छुक उमेदवारांनी इव्हेंटच्या माध्यमातून तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करूण जनसंपर्क वाढवला आहे

त्यामुळे आता महायुती महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर होणाऱ्या घडामोडी यावरच जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाचे भवितव्य अवलंबून आसुन जामखेड शहराच्या विकासाचा आजेंडा हाच खरा प्रचाराचा मुद्दा आसणार आहे

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा