ना.भा.तांबे ज्युनिअर कॉलेजच्या वतीने करण्यात आला खेळांडुंचा सन्मान.

जामखेड प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२५ -२६ आत्मा मलिक शैक्षणिक संकुल कोकमठाण, तालुका -कोपरगाव येथे पार पाडल्या.

92 किलो वजनी गटात कोपरगाव येथील पैलवान सिद्धेश्वर पाटील विरुद्ध पैलवान किरण जरे यांच्यात अंतिम कुस्ती झाली असता पैलवान किरण जरे विजेता ठरला. विजेता खेळाडू ना.भा. तांबे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स जामखेड चा विद्यार्थी असून त्याने आहिल्या नगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विभागासाठी प्रवेश निश्चित केला आहे

तसेच तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत गणेश सुधाकर कुलकर्णी 17 वर्षे वयोगटात चौथा क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली व डोके प्रज्ञा संतोष या विद्यार्थिनीचा बी.ए.एम.एस.ला पहिल्या फेरीमध्ये सेवा संघ गव्हर्नमेंट कॉलेज नाशिक येथे प्रवेश मिळाला तसेच महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मेत्रे माधुरी मॅडम या MH-SET परीक्षा पात्र झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो निर्णय क्षमता सहानुभूती शिस्त सहकार्याची भावना निर्माण होते आणि या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो हे मोलाचे विचार माननीय मंगेश (दादा) आजबे यांनी व्यक्त केले

तसेच सत्कार समारंभासाठी माननीय प्रवीण बोलभट (भाजपा शहर सरचिटणीस), विष्णू गंभीरे (भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष) खेळाडू चे वस्ताद बापू जरे सर ,व्यापारी बाळासाहेब जरे ,प्राचार्य घुमरे सर,शिंगण मॅडम, पिंगळे सर, पवार मॅडम नारायणकर मॅडम,राळेभात मॅडम, भैलुमे मॅडम,नवले मॅडम,गांगर्डे सर काशीद सर, मुळे सर, शिंदे सर, चव्हाण सर,शिंदे मेजर यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला


