सर्व विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा..

जामखेड प्रतिनिधी
प्रशासकीय इतर इमारतीचे कामकाज कुठेही चालु शकते.मात्र आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी इमारत सुसज्ज असायला हवी. यासाठी पुढील चार महिण्यात डिसेंबर अखेर उपजिल्हा रूग्णालय इमारतीचा एका मजल्याचे काम पुर्ण करण्याचा सुचना जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांनी बुधवारी (ता.२०) जामखेडला भेट दिली.यावेळी त्यांनी शहरात नव्याने होत असलेल्या उपजिल्हा रूग्णालय इमारतीची पाहणी करून, सबंधीतांना सुचना दिल्या.

यावेळी प्रांताधिकारी नितीन पाटील, प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार, शाखा अभियंता शांतीलाल लाड, चांगदेव बांगर, गटविकास अधिकारी शुभम जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, वैद्यकिय अधीक्षक डाॅ. रामदास मोराळे,डॉ सुनिल बोराडे यांच्यासह सबंधीत अधिकारी, ठेकेदार उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डाॅ आशिया यांनी उपजिल्हा रूग्णालय इमारतीची पाहणी करतानाच, पुढील चार महिण्यात एका मजल्याचे काम पुर्ण करून, त्याठिकाणी आरोग्य सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने इमारत सुसज्ज करण्याच्या सुचना दिल्या.

दरम्यान जिल्हाधिकारी आशिया यांनी तहसील कार्यालयात सबंधीत सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. यामध्ये जामखेड शहरातून जाणा-या महामार्गाचे रखडलेले काम तातडीने करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. या दौ-यात या महामार्गाची पाहणी त्यांनी केली.


