शिऊर  गावचे श्रीपती आप्पा निकम यांनी नागपंचमी साजरी करण्यासाठी  5 फुट वावडी तयार  करुन  जुन्या आठवणी ताज्या केल्या.

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

वावडी म्हणजे सगळ्यात जास्त आवडीची गोष्ट होती.पंचमीच्या आठ दहा दिवस अगोदर व आठ दहा दिवस नंतर वावडी उडवण्याचा खेळ चाले. वावडीच्या नादात शाळा बुडवून गुरं सांभाळण्याचीही तयारी असे.वावडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू परिसरात अगदी सहज उपलब्ध असायच्या.

उन्हाळ्यातच बाभळीचा डिंक गोळा करून ठेवण्याची तयारी असे. चांगला सरळ बांबू, दोरा,शेपटीचे दावे , कागद आणि सडा अशा वस्तूने वावडी घरीच तयार करण्याचे कौशल्य घरातील  मोठ्या माणसांच्या सानिध्यात प्राप्त व्हायचे.पंचमीच्या दिवशी तर वावडी तयार करण्याची स्पर्धा लागायची.

जुन्या काळातील माळवदाच्या  एका एका खणाच्या साईजची वावडी असायची. कौतुक आणि आनंद सर्व गावाचा असायचा. एकत्र येणं, आनंद मिळवणं अगदी सहज व्हायचं. माणसं घडणं आणि संस्कृती तयार होणं हे आपोआप व्हायचे. मला पक्षी होऊन आभाळात उडायचे आहे हि आजच्या काळातील लहान मुलांची कविता आहे. पण मी तयार केलेली वाकडी पक्ष्या पेक्षाही उंच आभाळात जाते हा आमच्या पिढीचा अनुभव आहे.

आजची पिढी या वावडीवरून पतंगावर आली आहे.वावडीतील मजा पतंगात नाही. त्या काळात पतंग म्हणजे अगदी सामान्य गोष्ट होती. वावडी काटाकाटी करणे. काटलेल्या वावडीचा सडा गोळा करणे.वावडयांची आभाळात टक्कर लावणे हे सर्व खेळ चालत.नागपंचमी म्हणजे वावडी हे समिकरण होते.
वावडीचे मंगळसुत्र तयार करणे,शेपटी लावणे आणि सड्याने आकाशात भरारी घेणं हि कामे खास कौशल्याची असायची. त्याची सांगड संसाराचे मंगळसुत्र शेपटासकट जीवनातील यशस्वी होण्यासाठीचा बोध असायची.

वावडी हि परंपरा आमच्या जुन्या जानत्यांनी पिढ्यानं पिढया जोपासली ती पुढे चालवणे आमचे काम आहे. पण ते आपण विसरत चाललो आहोत. त्याची खास आठवण करून देण्याचे काम श्रीपती आप्पा निकम यांनी केले. खूप छान वाटले.लहानपणीचा सर्व आनंद आठवला. खास नागपंचमी साजरी झाली.

नागपंचमी सणाचे आणखी एक खास गोष्ट म्हणजे सर्वांत मोठ्या झाडाचा झोका होय. वावडी हा मुलांचा आनंद तर झोका हा गावातील मुलींचा खास करून माहेराला आलेल्या मुलींचा आनंद होता. गावभर झोक्याचा आनंद घेत या मुली फिरायच्या, त्यामुळे त्यांच्या सुखदुःखाची माहिती गावाला व्हायची.झाडाला उंच गेलेला झोका काळजाचा ठेका चुकवायचा.संध्याकाळची फेर धरून महिलांची  गाणी हा आनखी एक आनंदाचा भाग होता.बसरवाडी ( शिऊर)शाळेच्या मुलींचा झोका आणि श्रीपत आप्पाची वावडीने जुन्या आठवणी ताज्या केल्या.

शब्दाकांन – एकनाथ (दादा) चव्हाण सर

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा