जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च

खर्डा चौक जामखेड येथे दंगा काबु योजनेचा सराव !
जामखेड प्रतिनिधी –
गणेश उत्सव हा अंतिम टप्प्यात आला असून यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनेही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संपुर्ण तयारी झालेली आहे. विसरजण मिरवणूकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व शांतता अबाधित राहील यासाठी सर्वांची जबाबदारी आहे.

जर कोणी काही गैरप्रकार केला किंवा कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच गणेश मंडळानी ध्वनी प्रदुषणाबाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले.

या बरोबरच त्यांनी गणेश उत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.आगामी गणेश विसर्जन मिरवणूक व ईद ए मिलाद च्या पार्श्वभुमीवर जामखेड शहर व पोलीस स्टेशनच्या वतीने जामखेड शहरात रूट मार्च व दंगा नियंत्रण प्रत्याक्षिक पार पडले. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत.

त्याच अनुषंगाने सुरू असलेला गणेश उत्सव व उद्या दि ५ रोजी मुस्लिम बांधवांच्या ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभुमीवर आज दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९:०० ते ११:०० वाजताचे दरम्यान जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत जामखेड शहरातील गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च जामखेड पोलीस स्टेशन, बीड कॉर्नर, मेन पेठ, संविधान चौक, तपनेश्वर रोड, भुतडा रोड, बीड रोड, खर्डा चौक व पुन्हा पोलीस स्टेशन येथे रुट मार्चचा समारोप करण्यात आला या दरम्यान खर्डा चौक जामखेड येथे दंगा काबु योजनेचा सराव घेण्यात आला. हा रुटमार्च आणि दंगा काबु प्रत्याक्षिक जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च करीता, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, परिविक्षाधीन उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांचेसह ४२ पोलीस अंमलदार, व ५२ होमगार्ड यांनी रूटमार्च काढण्यात आले.



