महापरिनिर्वाण दिनानिमित्त जामखेड पोलीस ठाण्यात महामानवाला अभिवादन..

- Advertisement -spot_img

आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण करून समाजात समानता-बंधुता जोपासू : पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी

जामखेड प्रतिनिधी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जामखेड पोलिस स्टेशन येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण करून समाजात समानता, बंधुता आणि न्यायाची भावना जोपासण्याचे आवाहन केले.

यावेळी सहाय्यक फौजदार शिवाजी कदम, पोलीस काॅन्स्टेबल योगेश दळवी, प्रकाश जाधव,दीपक बोराटे, सलीम शेख,जितेंद्र सरोदे, ईश्वर परदेशी तसेच पोलीस मित्र आकाश पटेकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा