संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हीने दिला जामखेड येथे बारावीचा पहिला पेपर; म्हणाली -‘वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हीने आज वडिलांचे आशीर्वाद घेतले व परीक्षा केंद्राकडे रवाना झाली होती. आज जामखेड तालुक्यातील परीक्षा केंद्रावर तीने बारावीचा पहिलाच पेपर दिला. परीक्षा देऊन पुढे चांगले शिक्षण घेऊन मी माझ्या वडिलांनी पहिलेले स्वप्न पूर्ण करणार आहे आसे देखील तीने सांगितले.


आपल्या वडिलांची हत्या झाल्यानंतर न्याय मिळवण्यासाठी लढा देणारी वैभवी देशमुख हिची देखील आज बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. वडिलांना न्याय मिळवून देण्याची लढाई आणि प्रचंड तणावाच्या वातावरणात दुःख बाजूला सारून वैभवी देशमुखने आपल्या वडिलांचे आशीर्वाद घेत परीक्षा केंद्राकडे रवाना झाली. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे वैभवी देशमुखने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वैभवी देशमुख ही आज दि 11 फेब्रुवारी रोजी सकाळी इयत्ता बारावीचा पहीला पेपर देण्यासाठी जामखेड तालुक्यातील परीक्षा केंद्रावर आली होती. तीचा दुपारी पेपर सुटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तीने सांगितले की माझे वडील माझ्यासोबत नाहीत, असा हा माझा पहिलाच पेपर आहे. मी सध्या नीट ची तयारी करत होते. त्यामुळे मी डॉक्टर व्हावे, असे माझ्या वडिलांना वाटत होते. मात्र, आज ते आमच्यात नाहीत. त्यांना जाऊन आज दोन महिने झाले मात्र घरात पाऊल ठेवले की त्यांची आठवण कायम येत असते. मात्र त्यांनी पाहिलेले स्वप्न मला पूर्ण करायचे असल्याचे वैभवी देशमुखने म्हटले आहे.

आरोपींन बाबत बोलताना तीने सांगितले की जे याघटनेतील दोषी असतील त्या आरोपींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे व आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असे देखील तीने सांगितले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा