सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरे करणे ही आपली संस्कृती:सचिन (नाना) घुमरे

- Advertisement -spot_img

शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करून होणार सचिन नानांचा वाढदिवस साजरा.

जामखेड प्रतिनिधी
सध्याच्या चंगळवादी दुणेयत युवकांमध्ये वाढदिवस साजरे करण्याचा वेगळा पायंडा पाडला आहे त्यामध्ये रस्त्यावर डि.जे.वाजवुन मोठ मोठे केप कापुन वाढदिवसा साजरे होत आसुन यामुळे आनाठाई खर्च होत आहे मागील काही दिवसापूर्वीच आतिवृष्टी झाली आणी शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यातच दिघोळ व परिसरात पुराच्या पाण्यात शेतीमाल सह विद्यार्थींचेही शालेय साहित्य वाहुन गेले

त्यामुळे आपला वाढदिवस डामडौलात साजरा करण्यापेक्षा आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो तसेच सामाजिक उपक्रम राबवुन वाढदिवस साजरा केला तर आजची तरूण पिढीही हा आदर्श घेऊन आसच वाढदिवस साजरा करतील याच भावनेतून जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन(नाना) घुमरे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे

तसा दरवर्षीही ते आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानेच साजरा करत असतात यावर्षी दिघोळ गणा मध्ये सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणार आहे.

विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षी त्यांनी रायटिंग पॅडचे चार हजार विद्यार्थ्यांना वाटप केले होते. त्याचप्रमाणे यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन (नाना) घुमरे मित्र परिवाराकडून सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात येणार आहे.


प्रमुख उपस्थिती म्हणून प्रत्येक गावातील स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन. व्हा. चेअरमन व सर्व संचालक, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याचे वाटप प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये होणार आहे.

चौकट
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सचिन घुमरे मित्रपरिवाराने 1500 शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्याचा जो समाज उपक्रम राबवला आहे तो कौतुकास्पद आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा