गणेश मूर्तीस भाविकाकडून गुप्तदान स्वरूपात पाऊण किलो चांदीचे दागिने अर्पण.

- Advertisement -spot_img

जामखेड शहरातील शिवाजी नगर येथील श्री अष्टविनायक गणेशाला पाऊन किलो चांदीचे दागिने करण्यात आले दान.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड  शहरातील भाविकाकडून  गुप्त दान स्वरूपात नाव जाहीर न करता  पाऊन किलो चांदीचे दागिने गणेश चरणी अर्पण गणेश भक्ताने आपले इच्छापूर्ती नवस पूर्ण झाल्यामुळे गणेश मूर्ती चांदी हार व चांदी मुकुट दागिने अर्पण केले आहेत.

जामखेड शहरांमधील नवसाला पावणाऱ्या या अष्टविनायक गणेश मंदिर पोलीस स्टेशनच्या मागे शिवाजीनगर नगर,चौधरी नगर येथील असलेल्या या गणेश मंदिराची सर्वत्र शहरात चर्चा होत आहे.या मंदिराच्या माध्यमाने दरवर्षी
गुरुजी नागेश देवा घायाळ व
गुरुवर्य महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड यांच्या मार्गदर्शनाखाली संत वामन भाऊ महाराज यांच्या आशीर्वादाने आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताह देखील मोठ्या उत्साहात व हजारो भाविकांच्या उपस्थित संपन्न होत आहे या सोहळ्यात रोज आठ दिवस अन्नदान देखील केले जाते

संपूर्ण वर्षभर हिंदू संस्कृतीचे सण व परंपरा जपत वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात नवसाला पावणाऱ्या या गणपतीची ख्याती पूर्ण शहरात तसेच तालुक्यात होत आहे.

या गणेशोत्सवानिमित्त दहा दिवस सर्वांनी गणपती आरतीचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन 
शिवगर्जना प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री पंकज शेठ चौधरी व अष्टविनायक गणेश मंदिर ट्रस्ट  मित्रपरिवार व  सर्व परिसर नियोजन समिती  यांच्यामार्फत सर्व नागरिकांना करण्यात येत आहे

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा