राम पवार यांच्या निवडीमुळे भटक्या मुक्त समाजातील तरूणांना मिळणार नवी दिशा..

- Advertisement -spot_img

भाजपच्या भटक्या मुक्त आघाडी प्रमुखपदी राम कंठीलाल पवार यांची निवड.

जामखेड प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते व सभापती प्रा.राम शिंदे यांचे खंदे समर्थक व प्रभाग पाच मधिल इच्छुक उमेदवार राम कंठीलाल पवार यांची भाजपच्या जामखेड शहर मंडल कार्यकारीणीच्या भटक्या मुक्त आघाडीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. याबाबत नुकतेच निवडीचे पत्र सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

राम पवार व त्यांच्या भगिनी लक्ष्मीताई पवार या जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची सेवा करतात. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांचे प्रश्न सोडवीले आहेत. त्यामुळे त्यांचा शहरात जनसंपर्क दांडगा आहे. पक्षाशी आणि सभापती प्रा.राम शिंदे यांच्या सोबत एकनिष्ठ राहून शहरासह तालुक्यात एकनिष्ठ काम केले आहे. राम पवार यांनी प्रत्येक निवडणुकीत भाजपकडून प्रचारप्रमुख म्हणुन जबाबदारी सांभाळली आहे.

पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी तनमनधनाने निष्ठेने काम केले आहे. विशेष म्हणजे विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पहिल्या निवडणुकी पासून ते 2024 पर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये स्वतःला झोकुन देऊन प्रचार यंत्रणा सांभाळली आहे आणि हीच पोहच पावती म्हणून भाजपने निवडीच्या माध्यमातून राम पवार यांना आनखी जबाबदारी दिली आहे.

निवड नंतर राम पवार म्हणाले की
सभापती प्रा.राम शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन एका सर्वसामान्य कार्यकर्त्यास जबाबदारी दिली आहे या जबाबदारीस मी नक्कीच पात्र राहील. पक्षाची ध्येय धोरणे आणि विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्या साठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचे लोक निर्माण करण्यास प्रयत्न करणार आहे. पक्षाचा विश्वास नक्कीच सार्थ ठरेल यात तीळ मात्र शंका नाही.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा