शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त गेली तेरा वर्षांपासून युवकांच्या प्रयत्नातून हा उत्सव आहे सुरू.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जमादारवाडीत सालाबादाप्रमाणे याहीवर्षी युवकांच्या प्रयत्नातून पायी ज्योत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि याची जोरदार तयारी सुरू आज दि.२१ सप्टेंबर रोजी गावातील युवक तुळजापूरकडे प्रस्थान करणार आहेत

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन तेथुन ऊर्जारूपी ज्योत पेटवून युवक हालगी झांज पथकासोबत आई राजा उदो उदो च्या जयघोषात पायी निघतात व घटस्थापनच्या दिवशी सकाळी जमादारवाडी गावाच्या सिमेवर सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ज्योतीचे मोठ्या मनोभावे स्वागत करून ती गावातील तुळजाभवानी मंदिरात ठेवतात घटस्थापनेपासुन ते विजयादशमी पर्यंत ही ज्योत आखंड प्रज्वलित ठेवली जाते

नवरात्रात मंदिर परिसराला विधुतरोषणाई केली जाते व दररोज देवीची नित्यपुजा पार पडते तसेच रात्री आठ ते आकरा यावेळेत आराधी मंडळांच्या माध्यमातून देवीच्या गाण्यांचा जागर करत आसतात यासाठी गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित आसतात




