जामखेड शहरातील दुर्गा देवी मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..

- Advertisement -spot_img

शिवसेनाचे तालुका प्रमुख प्रा. कैलास माने यांच्या हस्ते पहिल्या माळाची आरती झाली संपन्न.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील बाजार तळ येथील भाविक भक्तांचे श्रध्दा स्थान आसलेल्या दुर्गा माता मंदिरात घटस्थापना करून नवरात्र उत्सव सुरू झाला

पहिल्या माळेला शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा कैलास माने व सौ. वर्षा कैलास माने यांच्या हस्ते देवीच्या मुर्तीची प्रतिस्थापना करून आरती करण्यात आली यावेळी पहिल्याच दिवशी या आरतीसाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी बोलताना प्रा. माने म्हणाले की सालाबादाप्रमाणे याहीवर्षी दुर्गा माता मंदिर ट्रस्टच्या आयोजनतुन चांगला उत्सव संपन्न होणार आसुन वेगवेगळ्या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येत आहे

तसेच या मंदिरांच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू आसुन विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी तीस लाख रुपयेंचा निधी उपलब्ध करून दिला आहे काम प्रगतीपथावर आसुन पुढील कामांसाठी लोकवर्गणी करणे आवश्यक आसल्याने शहरातील दानशूर दात्यांनी मंदिरासाठी मदत करून आपल्या शहरातील दुर्गा देवीचे मंदिर व परिसराच्या विकास व्हावा यासाठी सढळ हाताने मदत करून ट्रस्टला सहकार्य करावे जेणे करून आपल्या शहरातील हे मंदिराच्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडुन भाविक भक्तांची याठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्था होईल आसे अवहान त्यांनी बोलताना केले

यावेळी राजू पवार, रवी वडे, ॲड. विकास पवार, राहुल मोरे, अमोल मोरे, महेश कटारिया, आशितोष बिडकर, दत्ता पवार, बालाजी मोरे, मल्लिकार्जुन पवार, प्रकाश पवार, बंडू डांगरे, नामदेव जगदाळे, मयूर पवार, मंगेश मोरे, किरण साळुंके व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा