महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी.

जामखेड प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज पेठ ते नागेश्वर मंदिरपर्यंतचा पलंग मार्गाची पाहाणी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व नगरसेवक अमित चिंतामणी यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी यांनी काल पाहाणी केली व तेथील अडचणी जाणून घेतल्या त्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी यांच्या समवेत चर्चा केली.

यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी सांगितले की नवरात्रीत सातव्या माळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि नागेश्वराच्या पावनभुमीत देवीचा पलंग या माळेला शहरात येतो हे जामखेडकरांचे भाग्य आहे

गेली आनेक वर्षांची ही परंपरा आहे या परंपरेनुसारच पलंगाचे स्वागत करून भाविकांच्या सोयींसाठी व सुरक्षिततेसाठी छत्रपती शिवाजी महाराज पेठेत पलंग आल्यानंतर शहरासह तालुक्यातुन पलंगाच्या दर्शनसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत आसल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्यामुळे दर्शनासाठी एकच झुंबड उडते अशाने व्यवस्थित रित्या दर्शन होत नाही आणि त्याचा त्रास महिला आणी ज्येष्ठ नागरिकांना होतो त्यामुळे प्रशासनाने दर्शनरांगेच नियोजन करावे

तसेच गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांचे दागिने मोबाईल पाकिटे यांची चोरी होते त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पलंग मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी केली आहे यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी नगरसेवक अमित(भाऊ) चिंतामणी संदिप बोगवत,विजय बोगवत,योगेश शेटे,दिपक कडेकर,निखिल कुलथे,बाळू पवार,शिवाजी(गुड्डू) विटकर,योगेश मेहत्रे, शिवराज विटकर,ओम कुलथे,प्रशांत राऊत आदिसह पेठेतील व्यापारी व युवा प्रतिष्ठिण चे पदाधिकारी उपस्थित होते.



