महिलांसाठी २४ व २५ सप्टेंबरला मोहटा देवीचे घडणार आहे दर्शन.


जामखेड प्रतिनिधी
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक आकाश दिलीप बाफना यांच्या वतीने यावर्षी शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त महिलांसाठी विशेष दर्शन सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्री क्षेत्र मोहटा देवी दर्शनासाठी दि.२४ व दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता आपल्या प्रभागांमधून व नवीन पोलीस स्टेशन समोरून वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

महिलांसाठी ही सोय विनामूल्य असून, दर्शनानंतर महाप्रसाद व फराळाचीही व्यवस्था आयोजकांनी केली आहे. इच्छुक महिलांनी आपली नावनोंदणी पूर्वसूचना म्हणून खालील क्रमांकावर करावी, असे आवाहन आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश दिलीप बाफना व मित्र परिवार यांनी केले आहे.

ही सामाजिक उपक्रमशील परंपरा नवरात्री उत्सवाला अधिक मंगलमय करणारी ठरणार असल्याचे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.



