नगरसेवक अमित(भाऊ) चिंतामणी यांच्यावतीने महिलांना मोहटादेवीचे घडले दर्शन,

- Advertisement -spot_img

गेली अकारा वर्षांपासून अमितभाऊंचा महिला भगिनींसाठी सुरू आहे धार्मिक उपक्रम

जामखेड प्रतिनिधी
“भाऊंचा उपक्रम आणि भगिनींची साथ”
बहुसंख्य महिला भगिनींनी घेतले मोहटादेवीचे दर्शन,भाऊंना दिले अशीर्वाद शारदीय नवरात्र उत्सव हा स्री शक्तीचा जागर आहे आणि या पर्व काळात आपल्या हातुन या शक्तीची सेवा घडावी या उद्देशाने
सभापती प्रा. राम शिंदे यांचे विश्वासू व अभ्यासु व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित(भाऊ)चिंतामणी यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे शारदिय नवरात्र उत्सवाचे आयोजन केले असून त्या आनुशंगाने
दि. २४ सप्टेंबर रोजी ५० ते ६० गाड्यांमधुन महिलांनी मोहटादेवी दर्शनासाठी प्रस्थान केले आणि आपल्या आहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शक्तीपिठ आसलेल्या मोहटादेवीचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले

यावेळी बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, पं.स. माजीसभापती डॉ. भगवान मुरूमकर,भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, नगरसेवक अमित चिंतामणी, बाजार समिती उपसभापती नंदकुमार गोरे, जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद, माजी संचालक पोपट नाना राळेभात, संजय राऊत, प्रविण चोरडिया, संचालक विष्णू भोंडवे, डॉ. अल्ताफ शेख,ॲड. प्रवीण सानप, आनंद ढवळे, भाजपा युवा नेते तात्याराम पोकळे, गणेश काळे, नारायण जायभाय, उमेश देशमुख, आदी मान्यवरांसह भाविक भक्त व महिला उपस्थित होत्या.

नगरसेवक चिंतामणी यांच्या वतीने होत असलेल्या शारदिय नवरात्र उत्सवाचे हे ११ वे वर्षे असून जामखेड शहरातीलमहिला भगिनींसाठी नेहमीच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या कार्यक्रमाची धुरा अमित चिंतामणी यांच्या सौभाग्यवती प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी घेतली आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी देशमुख गडी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून मोहटादेवी दर्शनासाठी महिलांसोबत प्रस्थान केले. महिला भगिनींनी नवरात्रोत्सवा दरम्यान होणाऱ्या सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी केले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा