लक्ष्मीताई पवार व युवा नेते राम पवार यांच्या तर्फे प्रभाग पाच मध्ये दिवाळी फराळ वाटप.

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

सामाजिक कार्यत अग्रेसर असणारे, अहोरात्र जनसेवेचा वसा घेतलेले आपल्या जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार व युवा नेते राम पवार यांनी वंचित लाभार्थी यांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून दिला आहे. आता दिवाळी निमित्ताने प्रभाग पाच मध्ये फराळाचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे प्रभागातील जनतेची दिवाळी गोड झाली आहे.

युवा नेते राम पवार व सामाजिक कार्यकर्त्या जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार यांनी पदरमोड करत स्वखर्चाने प्रभाग 5 मध्ये अनेक विकास कामे मार्गी लावले आहेत. पदरमोड करून आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान तसेच अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर उभारणी केली आहे. प्रभागातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी अभिनव उपक्रम राबविला आहे.

प्रभाग पाच हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या प्रभागातील दांडगा जनसंपर्क असणारे राम पवार व त्यांच्या भगिनी लक्ष्मीताई पवार अहोरात्र जनसेवेत असतात. लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सतत तत्पर असतात. जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सतत सामाजिक उपक्रम सुरू असतात यामुळे येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांची प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे.

सभापती प्रा राम शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून  राम पवार व लक्ष्मी पवार यांची ओळख आहे. सामाजिक कामात अग्रेसर, दांडगा जनसंपर्क यामुळे जनतेतून राम पवार किंवा लक्ष्मी पवार यांनी उमेदवारी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. दिवाळीत प्रभागातील जनतेची दिवाळी गोड व्हावी म्हणून फराळ वाटप हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. याबद्दल जनतेने आभार मानले आहेत व उमेदवारी करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा