भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद यांनी वाढदिवसा निमित्त जपला सामाजिक वारसा.

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी
युवा नेतृत्व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक वारसा जपला आहे. दि. 22 ऑक्टोबर 2025 या दिवशी अजय काशीद यांचा वाढदिवस , आणि वाढदिवस म्हटले की आपणा सर्वांना हवे असतात हारतुरे, मानसन्मान, मोठमोठ्या पार्ट्या, परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत या शुभदिनी आपला वाढदिवस सर्वसामान्य जनतेत, वंचितांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अजय काशीद यांनी एक छोटासा प्रयत्न केला आहे.

अजय काशीद यांचा वाढदिवस साकत गटातील सर्व गावामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. अजय काशीद यांनी राजकारण करत असताना नेहमीच शिक्षण आणि समाजकारण या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे. याच पद्धतीने वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक गावात भेटी देत असताना गावातील काय समस्या आहेत त्या आधी जाणून घेऊन माननीय नामदार सभापती राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्या कशा पूर्ण करता येतील यासाठी प्रयत्नशील राहिले त्याचबरोबर काही गावात शाळेत प्रोजेक्टर असेल मुलांना बसण्यासाठी बेंच असतील अशा बाबी कशा पूर्ण करता येतील यासाठी प्राधान्य दिले, आरोग्य संदर्भात सर्व अडचणी समजून घेऊन गाव भेटीत त्यावर लगेच जागेवर अंमलबजावणी केली. अशा एक ना अनेक प्रश्नांना हा भेटीत युवा नेते अजय काशीद यांनी हात घातला.

अजय काशीद यांचा वाढदिवस साजरा होत असताना तरुणाई सोबतच ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि त्यांचा उत्साह त्यांच्या कामाची पावती देऊन जात होता, एक आपला आणि हक्काचा माणूस अशी ओळख पुन्हा एकदा या माध्यमातून दादाची ओळख पहायला मिळाली. माझ्या आयुष्यात राजकारण करत असताना सर्वात आधी शेतकरी, दीन दुबळे , वंचित यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांना न्याय मिळून देण्याचे काम मी अगोदर करेन अशी प्रतिक्रिया त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने बोलून दाखवली.

दुग्धशर्करा योग म्हणजे माननीय नामदार सभापती राम शिंदे साहेब यांनीही अजय काशीद यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या.नेत्याने एका प्रामाणिक कार्यकर्त्याचा केलेला वाढदिवस हा नेहमीच त्याच्या साठी एक अनमोल ठेवा असतो.

अश्या प्रकारे 22 ऑक्टोबर हा दिवस अजय काशीद यांचा वाढदिवस आणि या शुभदिनी सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांचा वाढदिवस गटातील सर्वच गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रत्येक गावातील तरुणांमध्ये एक वेगळा आनंद दिसून येत होता.नामदार सभापती शिंदे साहेब ते गोरगरीब या समाजातील सर्व घटकांनी अजय काशीद यांना शुभेच्छा दिल्या आमच्या वृत्त पत्रकाच्या वतीनेही अजय काशीद यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा

चौकट.
आधी केले मग सांगितले.. अजय दादा काशिद यांनी आपल्या स्वतःच्या गावाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा ही शाळा आदर्श शाळा केली असून माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळून पाच लाख रुपये बक्षीस मिळवले आणि जलयुक्त शिवार योजनांतर्गत गावातील शेतकऱ्यांचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न मार्गी लावलाआपले गाव आदर्श बनवून काशीद कुटुंबाचा वारसा जपला आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा