नगरसेवक हर्षद काळे व भाजपाचे युवानेते राम पवार यांच्या वतीने पालावरील नागरिकांना दिले मिष्टान्न भोजन..

जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचा 1 जानेवारी रोजी वाढदिवस आणि आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा आसा मानस सभापतींनी व्यक्त केला होता याच अनुषंगाने जामखेड शहरातील दिन दुबळ्या घटकांसाठी काम करत आसेलेली जनविकास सेवाभावी संस्था या संस्थेच्या वतीने व जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक हर्षद काळे तसेच भाजपाचे युवा नेते राम पवार यांनी सभापतींच्या संकल्पनेतून मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना जिवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप केले व तेथील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन दिले

तसेच जामखेड बीड रस्त्यावरील वास्तव्य करत आसलेल्या गोसावी समाजाच्या पालावरती जाऊन त्यांनाही मिस्टन्न भोजन देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या
यावेळी बोलताना लक्ष्मीताई पवार म्हणाल्या की जो समाज शिक्षणापासून वंचित आहे त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आसुन सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी भटक्या समाजाच्या विकासासाठी ज्या शासनाच्या योजना आहेत त्यांचा पाठपुरावा करून त्या या समाज्याच्या उध्दारासाठी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार,नगरसेवक हर्षद काळे,भाजपा युवा नेते राम पवार,साहेबराव शिंदे,अर्जुन सावंत,आजिनाथ शिंदे,मोहन शिंदे,
जयश्री हतळगे,रुक्साना पठाण,राणी कोल्हे,नागा अक्का मार्कड,निशा पवार,संगिता सावंत,रंजना शिंदे, शोभा सावंत,साहिल बागवान,देवा देवकर,कविता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.



