शांतीनाथ महाराजांचा संजीवन समाधी उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा व्हावा : प्रा. मधुकर राळेभात

- Advertisement -spot_img

शांतिनाथ सेवा आश्रमासमोरील सौर दिव्याचे प्रा. मधुकर राळेभात यांच्या हस्ते उद्घाटन

जामखेड प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने जामखेड शहरातील महत्वाच्या ठिकाणावर १९ सौर ऊर्जेचे पथदिवे बसवण्यात येत आहेत.

याच अनुषंगाने ज्या महान संतांनी संजीवनी समाधी घेतली ते श्री शांतीनाथ महाराज यांच्या मंदिरासमोर जो सौरऊर्जेवरील पथदिवा बसवण्यात येत आहे त्याचे उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. कारण या दिव्याच्या प्रकाशामुळे शांतीनाथ महाराजांच्या भक्तांना उशिरापर्यंत त्यांचे दर्शन घेता येणार आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने जामखेड शहरातील महत्वाच्या ठिकाणावर १९ सौर ऊर्जेचे पथदिवे बसवण्यात येत आहेत. याच अनुषंगाने त्यापैकी एका सौर दिव्याचे उद्घाटन येथील शांतिनाथ सेवा आश्रम या ठिकाणी भाजपा नेते प्रा. मधुकर राळेभात यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ (आबा) पोकळे, पवनराजे राळेभात, संजय काका काशिद, शिक्षक नेते राम निकम, अमित जाधव, अंकुश उगले, राहुल उगले, चंद्रशेखर मोरे, सुधीर मोरे, ज्ञानेश्वर सानप, पुजारी नंदू खराडे आदि मान्यवरांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामखेड शहरातील विंचरणा नदी किनारी असलेला हा शांतीनाथ आश्रम असून श्री शांतिनाथ महाराज यांनी याठिकाणी सन १९७२ साली संजीवन समाधी घेतली होती. तेंव्हापासून प्रत्येक वर्षी या आश्रमात जेष्ठ शुध्द शष्टीला या ठिकाणी संजीवन समाधी सोहळा संपन्न होते. ठिकाणी विविध कार्यमांचे दरम्यान हरिनाम सप्ताह व पालखी सोहळा होत असतो. हा हायमॅक्स दिवा बसवल्याने या परिसरातील अंधार दुर होऊन भाविकांना रात्री उशिरापर्यंत दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांमधुन अनंद व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा