कोर्ट रोड गणपती मंदिराला आदर्श फाउंडेशनकडून साऊंड सिस्टिम भेट.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात आनेक पुरातन मंदिरे आहेत ती आपल्या शहराचे वैभव आसुन आध्यात्मिक संस्कृतीचे प्रतीक आहेत शहरवासीयांनी या मंदिरांच्या संवर्धनासाठी मदत केली पाहिजे जेणेकरुन शहराचा धार्मिक इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचणार आहे याच भावनेतून मंदिर परिसरातील भाविकांच्या मागणी समजुन साऊंड सिस्टीमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आसे बोलताना अकाश बाफना यांनी सांगितले.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे आदर्श फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश बाफना यांनी जामखेड शहरात नागरिकांचे अनेक प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात.

जामखेड शहरातील कोर्ट रोड येथील श्री गणपती मंदिरात महिला भजनी मंडळाला साऊंड सिस्टीमच्या अभावामुळे अडचण निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेत आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश दिलीप बाफना यांनी तातडीने मंदिराला साऊंड सिस्टीम भेट दिली आज या साऊंड सिस्टीमची विधिवत पूजा बाफना यांच्या हस्ते करण्यात आली

यावेळी या वेळी पांडुरंग माने,शिवकुमार डोंगरे,चेतन राळेभात, समीर शेख,स्वप्निल सोनार, नारायण जाधव,संजय फुटाणे, तुषार बोथरा, रोहित पारख, अशोक हुलगुंडे तसेच कोर्ट रोड परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. नागरिकांच्या वतीने आकाश बाफना यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सामाजिक उपक्रमाबद्दल बाफना यांचे ओंकार दळवी यांनी आभार मानले.



