भक्तिमय वातावरणात श्रीनागेश्वर उत्सवाची सांगता
जामखेड प्रतिनिधी
“आपल्या मुलांच्या हातात गीता, ज्ञानेश्वरी, गाथा द्या. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नका. आपली संस्कृती आपला धर्म याविषयी मुलांना ज्ञान द्या. नाहीतर पुढील वीस वर्षानंतर चा काळ भयानक असेल” असे प्रतिपादन ह.भ.प. चेतन महाराज बोरसे यांनी केले.

औषध घरपोच कुरिअरने मिळेल औषधाची किंमत फक्त रुपये 5500₹ त्याच्यामध्ये तुम्हाला 90 दिवसांची औषधे मिळतात आणि सोबत 90 दिवसांची औषधे मोफत मोफत मोफत ऑफर फक्त आजच गरजूंनी लाभ घ्यावा..
शंभर टक्के प्रभावी आणि गुणकारी आयुर्वेदिक औषध कोणतेही केमिकल नाही डायटिंग व्यायाम करण्याची गरज नाही घरबसल्या खाऊन पिऊन वजन कमी करा..
▪️आजच फोन करा नाव पत्ता व्हाट्सअप करावा मोबाईल नंबर 7387447577
👉 वरील नंबर वर फोन करा व पत्ता व्हाट्सअप करावा औषध पाच दिवसात तुम्हाला घरपोच कुरिअरने मिळेल.
श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त जामखेड येथे श्रीनागेश्वर पालखी सोहळा, शिवलीलामृत पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण उत्सवाची सांगता श्री. बोरसे महाराज यांच्या कार्याच्या कीर्तनाने झाली.

हरीने माझे हरीले चित्त l
भार वित्त विसरले ll
जगद्गुरु तुकोबाराय यांच्या वरील अभंगावर बोरसे महाराज यांनी आपले विचार मांडले. संपूर्ण अभंगाचा भावार्थ सांगून झाल्यानंतर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे गोकुळातले चरित्र वर्णन केले.

यावेळी त्यांच्या सुमधुर आवाजात त्यांनी अनेक गवळणी अभंग गायले.
ते म्हणाले काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्णाचे चरित्र वर्णन करावे असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. कोणत्याही उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने अर्थात श्रीकृष्णाचे चरित्र वर्णन केल्याशिवाय होत नाही. “
बोरसे महाराज पुढे म्हणाले ‘भजन हेच आपल्याला तारणारे आहे. त्यामुळे जीवनात प्रत्येकाने भजन करावे. प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचावी आपल्या मुलांना देखील ज्ञानेश्वरी, हरिपाठ, भगवतगीत वाचण्याची सवय लावा. थोडा वेळ देवघराच्या समोर त्यांना बसवा. आज तरुणांना धर्म शिक्षणाची फार मोठी गरज आहे. पुढची पिढी देवभक्त आणि राष्ट्रभक्त झाली पाहिजे. आपल्या मुलांना उच्च शिक्षित जरुर करा परंतु त्याचबरोबर त्यांना धर्मशिक्षणही द्या. आता बऱ्याच शाळांमध्ये मुलांना गंध लावून येण्यास परवानगी नाही. गळ्यात माळ घातलेली त्यांना चालत नाही. हे सर्व कशासाठी चाललंय असा सवाल यावेळी बोरसे महाराज यांनी केला.

22 वर्षापासून श्रीनागेश्वर सेवा व सप्ताह समितीने यात्रेला धार्मिक वळण देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. याबाबत बोरसे महाराज यांनी मंडळाचे विशेष कौतुक केले.
दरम्यान विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे तसेच आमदार रोहित पवार व यांनी स्वतंत्रपणे सप्ताहास भेट दिली. व श्रीनागेश्वराची पूजा करून दर्शन घेतले. या दोन्ही मान्यवरांचे समितीच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले. त्यांच्या समावेत भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या संपूर्ण उत्सवासाठी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे बाबासाहेब खराडे, बबलू देशमुख, मिलिंद ब्रम्हे, संतोष बारगजे, विनायक राऊत, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, दिलीप कुमार राजगुरू, महादेव पानसाडे, सिताराम राळेभात
उमेश देशमुख, राजेंद्र देशपांडे, दत्तात्रय काळे, सत्येंद्र पाटील, शाम क्षिरसागर, किरण सोनवणे,नंदू शिंदे, दर्शन भोसले, आदित्य पोकळे
ओम भोसले, कृष्णा मिसाळ, रोहित खवळे
रोहन बांदल, सुमित बकरे, आर्यन धनवडे, ओम काकडे, अक्षय राळेभात, रोहित शिंदे, रोहित कोल्हे
सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे, अहोरात्र अथक परिश्रम घेतले.



