जामखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांचेकडून तहसिलदार यांना निवेदन

- Advertisement -spot_img

जामखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह नागरिक व व्यावसायिकांचेही मोठे नुकसान

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिक व व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले असून सर्व नुकसानग्रस्तांचे पंचनामे व्हावेत. तसेच शेतकऱ्यांचना कर्जमाफीसह द्यावी.
यासाठी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या नेतृत्वाखाली आज दि. २३ सप्टेंबर रोजी जामखेड तहसील कार्यालयात तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांचेसह नगरसेवक अमित जाधव, दिगांबर चव्हाण, ॲड. अमृत राळेभात, प्रवीण बोलभट, विष्णू गंभीरे, सुर्यकांत सदाफुले आदि शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. १९ सप्टेंबर पासून जामखेड तालुक्यातील सर्वच भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. त्यातच दि. २१ रोजी रात्री ७:०० वाजल्यापासून पाहटे पर्यंत पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. शेतकऱ्यांचे, सामान्य नागरिकांचे कष्टकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे व व्यवसाईकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना मदत मिळणे आवश्यक आहे.

यासाठी खालील गोष्टींचे त्वरित पंचनामे व्हावेत व नुकसान भरपाई मिळावी. १) हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीन, उडीद व तुर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्वरीत मदत मिळावी. २)अतिवृष्टीमुळे कांदा चाळीत पाणी जाऊन सर्व कांदा सडला आहे. त्याचेही पंचनामे होऊन मदत मिळावी. ३) नवीन लागवड केलेल्या कांदा पिकांच्या नुकसानीचेही पंचनामे करावेत. ४) ओढे, नाले व बंदारे फुटून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचेही पंचनामे होऊन भरपाई अनुदान मिळावे. ५) घर गोठे व भिंती पडून सामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही तातडीने मदत मिळावी. ६) पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या गोधनाचेही पंचनामे व्हावेत. यासह विविध अश्या अकरा मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे. यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशीही मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा