दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य व दोन वेळा नगरसेवक पदाचा मिळाला शेळेकेंना मान..

जामखेड प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक एकच्या सर्वागीण विकासासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुमन आशोक शेळके यांनी बाजी मारली. सुमन अशोक शेळके या सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात. याच आनुशंगाने जामखेड नगरपरिषद निवडणूकीत त्यांनी भरघोस मते मिळुन सलग चौथ्यांदा विजयी होण्याचा मान मिळविला आहे.

जामखेड नगरपरिषदेत सभापती प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने लढविलेल्या निवडणूकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत भाजपचे एकुण १५ नगरसेवक व व नगराध्यक्षा पदाच्या प्रांजलताई आमित चिंतामणी यांचा देखील विजय झाला.

याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक एक मधुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणार्या भाजपच्या सुमन अशोक शेळके यांना या निवडणुकीत ६०० मते मिळुन बाजी मारली आहे. मागिल आनेक वर्षांपासून त्या आपले पती अशोक शेळके यांच्या सोबत सामाजिक कामाच्या माध्यमातून लोकांची सेवा करीत आहेत.याच सामाजिक कामाचे फळ त्यांना यावेळी देखील मिळाले आहे.

विशेष म्हणजे दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य व दोन वेळा नगरसेवक पदाचा मान
मिळविण्यात त्यांना यश आले. यावेळी जामखेड नगरपरिषद निवडणुकीत सलग चौथ्यावेळी त्या नगरसेविका झाल्या आहेत. नगरसेवक असताना प्रभागात मोठ्या प्रमाणात केलेला विकास त्यांच्या कामी आला. सुमन शेळके यांनी प्रभागात विकासाच्या माध्यमातून लोकांना घरकुल योजना, रस्त्याचे डांबरीकरण सभामंडप पेव्हिंग ब्लॉक सह विविध कामे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून केली आहेत. सुमन अशोक शेळके यांना प्रभाग क्रमांक एक मधिल जनतेने विश्वास ठेऊन निवडुन दिल्या बद्दल त्यांनी नागरीकांचे आभार मानले. तसेच पुढील पाच वर्षे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करित त्यांच्या माध्यमातून प्रभागात मोठ्या प्रमाणात नीधी आनुन प्रभागाचा चेहरामोहरा बदलणार आसल्याचे देखील सांगितले.


