सेवा-सुरक्षा-निराधार संकल्पनेतून प्रांजलताई चिंतामणींचा प्रेरणादायी उपक्रम!

- Advertisement -spot_img

प्रांजलताई चिंतामणी यांच्या वतीने वीरमाता-वीरनारींना दिवाळी फराळाची गोड भेट..

जामखेड प्रतिनिधी
सेवा-सुरक्षा-निराधार ही संकल्पना जोपासत नगरसेवक अमितभाऊ चिंतामणी यांनी जामखेड पंचक्रोशीतील भारतीय सैन्याच्या तिनही दलातील आजी-माजी बहादूर सैनिक, वीरमाता आणि वीरनारी यांचा दीपावलीनिमित्त सन्मान केला.

या उपक्रमांतर्गत नगरसेवक अमितभाऊ चिंतामणी यांनी प्रत्येक सैनिक व वीरपरिवारातील सदस्यांना गुलाबपुष्प देऊन आदरांजली वाहिली, तर सौ. प्रांजलताई चिंतामणी यांनी दिवाळी फराळाची गोड भेट देत त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाचे स्मरण ठेवत समाजात आदराची भावना दृढ व्हावी, हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे नगरसेवक चिंतामणी यांनी सांगितले. या उपक्रमाबद्दल शहरात सर्वत्र प्रशंसेचे वातावरण असून, वीरमाता आणि वीरनारींनीही कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा