पै. चिराग आजबे व मंगेश आजबे यांच्या साकत गटातील डिसलेवाडी गावभेट दौर्यास मोठा प्रतिसाद

जामखेड प्रतिनिधी
साकत गटातील डिसलेवाडी गावातील ग्रामस्थांशी पै. चिराग मंगेश आजबे व मंगेश (दादा) आजबे यांनी गावभेटी दरम्यान मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि गावाच्या विकासाची दिशा जाणून घेतली. जनतेच्या डोळ्यातील विश्वासच आमची खरी ताकद आहे, साकत जिल्हा परिषदेच्या हद्दीतील सर्व गावांनसह “डीसलेवाडीचा विकास हे केवळ वचन नाही, तर तो आपला संकल्प आहे आसे देखील बोलताना पै. चिराग आजबे यांनी सांगितले..

सध्या नगरपरिषदेच्या व नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच लवकच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर होणार आहेत. याच आनुशंगाने पै. चिराग आजबे व मंगेश दादा आजबे यांनी साकत जिल्हा परिषद गट पिंजुन काढण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

त्यांनी अत्तापर्यंत साकत जिल्हा परिषद गटातील आनेक गावांना गावभेटी दिल्या त्यावेळी त्यांचे सर्वच गावातील ग्रामस्थांनी त्यांचे गावात आगमन होताच वाजत गाजत स्वागत केले. व आम्ही या निवडणुकीच्या वेळी पै. चिराग मंगेश आजबे यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे रहाणार आहोत आसे सांगितले. यावेळी डीसलेवाडी येथिल ग्रामस्थांना पै. चिराग आजबे व मंगेश आजबे यांनी भेट दिली यावेळी ग्रामस्थांनी बोलताना सांगितले की. शेतकरी नेते म्हणून मंगेश दादा आजबे यांची ओळख आहे. त्यांनी अत्तापर्यंत आनेक शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी दुध आंदोलन मार्केट कमीटीत पसा पध्दत बंद करण्यासाठी आंदोलन शेतीमालाल भाव मिळावा यासाठी अनेक आंदोलने केली आहेत. त्यामुळे मंगेश दादा आजबे यांचे सामाजिक काम सर्वांना माहित आहे. आपल्या गावातील लोकांच्या हाकेला ओ देणारा माणुस म्हणजे मंगेश दादा आजबे आहेत. त्यामुळे त्यांचे पुत्र पै. चिराग मंगेश आजबे हे साकत जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत आपण सर्वांनी त्यांना या निवडणुकीच्या आनुशंगाने साथ देऊ असे सांगितले.



