अजिंक्यतारा पेट्रोलियम च्या माध्यमातून बेलेकर व कोळी परिवार जामखेडकरांना स्वच्छ पेट्रोल व डिझेल देत आहेत :आ. रोहित पवार.

जामखेड प्रतिनिधी
आ. आमदार रोहित (दादा) पवार यांची अजिंक्यतारा पेट्रोलियम, जामखेड येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना आ. रोहित दादा पवार म्हणाले की, अजिंक्यतारा पेट्रोलियमच्या रूपाने जामखेड शहराचे वैभव वाढले आहे. जामखेडच्या जडणघडणीत बेलेकर व कोळी कुटुंबाचे योगदान खुप मोठे आहे आसे मत आ. रोहीत पवार यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले की अजिंक्यतारा पेट्रोलपंप याठिकाणी चांगले पेट्रोल मिळत आहे. या पेट्रोल पंपामुळे गरजु तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच जामखेड तालुक्यात व्यापार वाढीसाठी प्रयत्न करणारे बेलेकर व कोळी घराणे यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. या पेट्रोलियमच्या अनेक शाखा होत राहो. बेलेकर व कोळी कुटुंब पेट्रोल पंप व्यवसायात ग्राहकांना चांगली सेवा देत नावलौकिक करतील. ग्राहकांना चांगली सेवा द्या निश्चित आपली भरभराट होणार आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अजिंक्यतारा पेट्रोलियमचा शुभारंभ हभप विजयकुमार बागडे महाराज, हभप ज्ञानेश्वर पवळे महाराज व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मागील आठवड्यात संपन्न झाला होता. यावेळी आ. रोहित (दादा) पवार यांना पूर्व नियोजित दौऱ्यामुळे येता आले नव्हते त्यामुळे त्यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन अजिंक्यतारा पेट्रोलियमला शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक अमोल राळेभात, सुर्यकांत मोरे, मंगेश आजबे विजयसिंह गोलेकर, शहाजी राळेभात
दत्तात्रय वारे, अमोल गिरमे, बिबीशन धनवडे, दशरथ निमोणकर, राजु गोरे, राजेश वाव्हळ, सुनिल शिंदे, संरपच सागर कोल्हे, समीर चंदन, निखील घायतडक, प्रकाश सदाकूले, हरिभाऊ बेलेकर, ईश्वर कोळी, विनोद बेलेकर, रामकिसन कोळी, संजय बेलेकर, वैभव कोळी, ज्ञानेश्वर कोळी, साहिल बेलेकर, पवन बेलेकर, अवधूत बेलेकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



