जामखेड शहरात गोळीबार,हॉटेल मालक गंभीर जखमी..

- Advertisement -spot_img

सात ते आठ जणांच्या टोळीने हॉटेलवर हल्ला करत केला गोळीबार..

जामखेड प्रतिनिधी
जामखेड–बीड रोडवरील हॉटेल कावेरी येथे बुधवारी मध्यरात्री थरारक घटना घडली.सात ते आठ जणांच्या टोळीने हॉटेलवर हल्ला करत तोडफोड केली तसेच गोळीबार केला.

या घटनेत हॉटेल मालक रोहीत अनिल पवार (वय २७, रा. कान्होपात्रा नगर, जामखेड) हे गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहीत पवार हे रात्री हॉटेलवर गिर्‍हाईक पाहत असताना सुमारे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आरोपींची टोळी हॉटेलवर आली.

आरोपींनी हॉटेलची तोडफोड करत रोहीत पवार यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांच्या पायाला गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी हॉटेल मालकाची चारचाकी गाडीही फोडली असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.घटनेनंतर जखमी रोहीत पवार यांना तातडीने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर (नगर) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. मागील भांडणाच्या कारणावरून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.घटनास्थळी अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून गावठी कट्ट्याचे अवशेष सापडले आहेत. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा