नंदा प्रविण होळकर महिलांमध्ये ४८८ या सर्वाधिक मताधिक्याने प्रभाग सात मधून विजयी.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधून सामान्य कुटुंबातून आलेल्या नंदा प्रविण होळकर यांनी ९१० मतांच्या विक्रमी आघाडीने विजय मिळविला.महिलांमध्ये ४८८ या सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा बहुमान त्यांनी मिळविला. शांत, संयमी आणि विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत नागरिकांनी मतदानरूपी आशिर्वाद दिल्याने हा विजय साकार झाला विशेषतःमहिलांचा व तरुण वर्गाचा भक्कम पाठिंबा मिळविण्यात हे होळकर दांम्पत्य यशस्वी ठरले.

नंदा होळकर यांचे पती प्रविण होळकर हे भारतीय जनता पक्षाचे जामखेड शहर मंडल उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पक्षाशी एकनिष्ठ राहून विचार व ध्येयधोरणे राबविल्याचे फलित म्हणून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षश्रेष्ठींनी नंदा होळकर यांना उमेदवारी दिली होती.

प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांकडे संयमाने व सकारात्मकतेने पाहणारे नेतृत्व म्हणून प्रविण होळकर यांची ओळख आहे. त्याच विश्वासातून मतदारांनी त्यांच्या सौभाग्यवती नंदा होळकर यांना भरघोस मते देत त्यांना विजयी केले असून, या निकालामुळे प्रभाग ७ मध्ये भाजपाची ताकद अधिक बळकट झाली आहे.



